दिलासादायक ! शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास 26 दिवसातचं मिळणार नुकसान भरपाई ; सरकारने दिली माहिती

Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. याशिवाय शेतकऱ्यांना इतरही अन्य काही कारणांमुळे नुकसान सहन करावे लागते. जसे की वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते.

अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी काही तासातच उध्वस्त करत असतात. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते. परिणामी अशा शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असते. वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे प्रावधान देखील आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यासंदर्भात आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत एका लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना अवघ्या 26 दिवसात नुकसान भरपाई देऊ केली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी योगेश कदम यांनी कोकणातील वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे होत असलेल्या पिकांच्या नासाडी संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेसाठी नितेश राणे, भास्कर जाधव, बच्चू कडू इत्यादीनी सहभाग नोंदवला. या लक्षवेधीला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोकणात माकडांची तसेच रानडुकरांची संख्या जास्त आहे. माकडाच्या उपद्रवांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई वाढवून देणे संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे.

ही समिती इतर राज्यांची माहिती जमा करत आहे. यावेळी आंबे वं काजू मोहोळ नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. यावर वनमंत्री यांनी झाडांचे मोजता येते मात्र मोहोळचे नुकसान कसे मोजायचे हा मोठा प्रश्न आहे. यामुळे वन विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या नुकसानीची मोजणी केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वन्य प्राण्यांच्या नुकसानीबाबत मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर भास्कर जाधव यांनी एक उपाय देखील सुचवला. जाधव यांच्या मते माकडांना रान अंजीर, शेवगा व उंबर खूप आवडते. यामुळे जर या झाडांची लागवड जंगलात मोठ्या प्रमाणात करण्यात आली तर माकडे शेतात घुसणार नाहीत.

आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल असं सांगितलं. सुधीर मुनगंटीवार यांनी हा एक चांगला सल्ला असल्याचं मान्य केलं आणि संबंधित समितीला याबाबत कळवले जाईल आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं मत मांडलं.