पीकविमा म्हणावं की पैसा कमवण्याचं साधन ! एका वर्षात पीक विमा कंपन्यानी कमवला पाच हजार कोटींचा नफा ; शेतकरी मात्र आजही संकटात

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाकडून वेग-वेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. मात्र अनेकदा असं होत की शेतकऱ्यांच्या नावाने सुरू झालेली योजना हीं शेतकऱ्यांसाठी लाभदायक सिद्ध होत नाही. याउलट शेतकरी हिताच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढते आणि इतर दलाल शेतकऱ्यांच्या नावाने मलाई खातात.

2016 साली सुरू झालेल्या पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत देखील काहीस असच आहे. पंतप्रधान पिक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना भरपाई देणे हेतू सूरु करण्यात आली होती. मात्र या योजनेचा हा हेतू बाजूला राहिला आहे. कारण की पंतप्रधान पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होताना तर पाहायला मिळत नाही मात्र पिक विमा देणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यामध्ये मात्र हजारो कोटी रुपयांची वाढ होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो शेतकरी बांधवांना पीक नुकसानीच्या मोबदल्यात तुटपुंजी रक्कम दिली जात असून पिक विमा कंपनी मात्र गडेगंज कमाई करत आहे. हेच कारण आहे की गेल्या एक वर्षात पिक विमा कंपन्यांनी तब्बल 5000 कोटी रुपयांचा नफा कमवण्याची धक्कादायक आकडेवारी लोकमतमध्ये देण्यात आली आहे. पिक विमा योजना हीं नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना विमा संरक्षण सुरू करण्यात आलेली एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.

मात्र यामुळे पिकांना संरक्षण तर नाही मात्र कंपन्यांना निश्चितच संरक्षण मिळत आहे. खरं पाहता पिक विमा कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा कमवत आहेत. मात्र शेतकरी बांधवांच्या पीक विम्याची रक्कम काही कंपनीच्या हातून सुटत नाही. यामुळे कंपनीच्या विरोधात आता न्यायालयात शेतकरी बांधवांनी याचिका दाखल केले आहे. सांगोलाचे शेतकरी गोरख घाडगे यांनी पिक विमा कंपन्यांनी शेतकरी बांधवांना पिक विमा दिला नसल्याची तक्रार न्यायालयात केली असून न्यायालयाने सात पिक विमा कंपन्यांना जवाब देण्यासाठी तलब केले आहे. दरम्यान अद्याप या पीक विमा कंपन्यानी माननीय न्यायालयात जवाब दिलेला नाही.

मित्रानो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की रिलायन्स इन्शुरन्स आणि भारतीय कृषी विमा या दोन कंपन्यांनी सर्वाधिक नफा कमवला आहे. रिलायन्स इन्शुरन्स या कंपनीने 920 कोटी रुपये तर भारतीय कृषी विमा या कंपनीने 1692 कोटी रुपये नफा कमवल्याचे एका आकडेवारीत उघड झाले आहे.

याव्यतिरिक्त एचडीएफसी ऍग्रो इन्शुरन्स या कंपनीने 497 कोटी कमवले तर इफको टोकीओ इन्शुरन्स 778 कोटी कमवले, भारती आकसाने 507 कोटी कमवले तसेच बजाज आलायन्सने 581 कोटी कमवले. निश्चितच हा आकडा बघितल्यानंतर नेमका पिक विमा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आला होता की पिक विमा कंपन्यांसाठी हा प्रश्न उपस्थित होणे लाजवी आहे.