Agriculture News : शिंदे सरकारच बळीराजाला मोठ गिफ्ट ! आता ऊस उत्पादकांना मिळणार एकरकमी एफआरपी ; शेतकऱ्यांच्या लढ्याला आल यश

Agriculture News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपासून ऊसाला एक रकमी एफआरपी दिली जावी यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारकडे मागणी केली जात होती. स्वाभिमानी शेतकरी संघटन्यासारख्या अनेक राजकीय पक्षांकडून तसेच शेतकरी संघटनांकडून आंदोलन देखील सुरू होती. शेतकऱ्यांचा देखील यामध्ये समावेश होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत नवोदित शिंदे-फडणवीस सरकारने एकरकमी एफ आर पी शेतकऱ्यांना दिली जावी हा मोठा निर्णय घेतला आहे.

तसेच यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच वर्तमान उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजाला दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फीडर सौरऊर्जेवर करण्यासाठी शासनाकडून मोठा प्रकल्प हाती घेतला असल्याचे सांगितले.

Advertisement

यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले की, ऊस उत्पादकांच्या मागणीसाठी राज्य शासन सकारात्मक असून शासनाने एकरकमी एफ आर पी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन साखर कारखान्यांमध्ये असणारे हवाई अंतर याविषयी देखील सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी शासनाची असल्याचे त्यांनी या बैठकीत नमूद केले.

तोडणी आणि वाहतुकीबाबत निकष ठरवले जाणार आहेत. तसेच पुढील हंगामापासून साखर कारखानांना डिजिटल वजन काटे सुरू करण्यात यावेत असे आदेश देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ऊस वाहतूकदारांच्या समस्यांबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र देण्याचे निर्देश या बैठकीत शिंदे यांच्याकडून देण्यात आले.

निश्चितच काल झालेल्या बैठकीत उत्पादक शेतकरी बांधवांचा एक रक्कम एफआरपीचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रश्न निकाली निघाला आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत. 

Advertisement