प्रयोगशील शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम ! अद्रक, लसूण, मिरचीपासून बनवले सेंद्रिय कीटकनाशक ; पीक उत्पादनात झाली भरीव वाढ

Agriculture News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. खरं पाहता रासायनिक कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने जमिनीचा पोत ढासळत चालला आहे. शिवाय यामुळे मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आता जाणकार लोकांकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय कीटकनाशक वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

विशेष म्हणजे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा लक्षात घेता आता काही प्रयोगशील शेतकरी बांधव घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दशपर्णी उपयोगात आणत आहेत. काही प्रयोगशील शेतकरी तर स्वतः दशपर्णी तयार करून पिकांसाठी वापरत असल्याचे चित्र आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वाशिम तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने असाच एक भन्नाट प्रयोग केला असून दशपर्णी मध्ये वापरल्या जाणाऱ्या पानांव्यतिरिक्त काही अन्य पदार्थांचा वापर करून सेंद्रिय कीटकनाशक तयार करण्याची किमया साधली आहे. वाशिम तालुक्यातील मौजे बिटोडा तेली येथील प्रयोगशील शेतकरी देविदास राऊत व त्यांच्या दोन भावांनी मिळून दशपर्णी मध्ये वापरल्या जाणाऱ्या पानांव्यतिरिक्त अद्रक, लसूण, मिरची याचा वापर करून सेंद्रिय कीटकनाशक तयार केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या शेतकऱ्यांच्या मते, या सेंद्रिय कीटकनाशकामुळे पिकांवरील अळ्यांचा नायनाट होण्यास मदत होते. यामुळे उत्पादनात भरीव वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे राऊत बंधूंचा हा पहिलाच प्रयोग नसून याआधी त्यांनी टॉनिक तयार केले होते. आता सेंद्रिय कीटकनाशक तयार केले आहे.

या सेंद्रिय कीटकनाशकात लसूण, अद्रक, मिरची याचा वापर केला जात असल्याने हे कीटकनाशक पिकावर फवारल्यास कीटकांच्या शरीरात आग होते आणि त्यांचा नायनाट होतो. यामुळे कीटक, आळ्यांची अंडी, तसेच बुरशी देखील नाहीशी होत असते. या प्रयोगशील शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे, या कीटकनाशकांचा उग्र वास येत असल्याने याचा धुईवर परिणाम होतो, शिवाय त्यामुळे कीटकावर नियंत्रण मिळवता येते.

सध्या या कीटकनाशकांचा वापर राऊत बंधू आपल्या पिकांवर करत आहेत. निश्चितच राऊत यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील प्रेरक ठरणार असून त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने कीटक नियंत्रणासाठी शेतकरी बांधव वेगवेगळे प्रयोग करतील यात तीळ मात्र देखील शंका नाही.