Ahmednagar Breaking : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 860 कोटींची मदत मिळणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक कामाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. नगर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.

अशा परिस्थितीत आता नगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई म्हणून जिल्हा प्रशासनाकडून 860 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली जाणार आहे. साहजिकच जिल्हा प्रशासनाकडून असाच प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेल्यास आणि शासनाने यावर सकारात्मक विचार केल्यास अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 860 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अनुदान स्वरूप मिळणार आहे.

यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. अतिवृष्टी मुळे तसेच सततच्या पावसामुळे श्रीगोंदे तालुक्यात सर्वाधिक नुकसानाची नोंद झाली आहे. प्रशासनाच्या पाहणीनुसार तालुक्यातील 66 हजार 950 शेतकरी बांधवांचे 41 हजार 118 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी तालुक्याला तब्बल 112 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

तालुक्यात झालेल्या नुकसानीची दोन टप्प्यात पाहणी आणि पंचनामे झाले असून सदर अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे श्रीगोंदे तालुक्यातील 21 हजार 129 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एवढ्या क्षेत्रातील 33 हजार 985 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे तालुक्यातील १९९८९ हेक्टर क्षेत्रावरील 32965 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही वेळच्या नुकसानी पोटी तालुक्याला 112 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत आता शासनाकडून यावर काय निर्णय घेतला जातो आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी एकूण किती नुकसान भरपाई दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निश्चितच प्रशासनाने मागणी केलेली नुकसान भरपाई अहमदनगर जिल्ह्यासाठी मंजूर झाल्यास अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

नुकसान भरपाईमुळे झालेले नुकसान संपूर्ण भरून काढता येणे अशक्य आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांना तूर्तास का होईना दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसात नुकसान भरपाईबाबत शासनाकडून प्रशासनाला कळविले जाईल आणि त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.