Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी कामाची बातमी ! ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास ‘या’ नंबरवर एक कॉल करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : ऊस हे राज्यात उत्पादीत होणार एक मुख्य नगदी पीक आहे. सध्या राज्यात ऊस गाळप हंगाम सुरु आहे. 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेला हंगामाला आता दोन महिने उलटली आहेत. अशातच ऊस उत्पादकांसाठी प्रादेशिक सहसंचालक साखर मिलिंद भालेराव यांनी एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.

खरं पाहता उसाचा गाळप हंगाम सुरू झाला की सर्वत्र ऊस उत्पादकांची आर्थिक कोंडी केली जाते. ऊस तोडणी साठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जातात. मात्र आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास संबंधित मुकादम आणि कामगारांवर कारवाई केली जाणार आहे.

यासाठी शेतकरी बांधवांना तक्रार करावी लागणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या समस्येसाठी तसेच अशा प्रकारच्या तक्रारी दूर करण्यासाठी तक्रार निवारण अधिकारीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.

यावेळी मिलिंद भालेराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न संपूर्ण राज्यात ऐरणीवर आला होता. अतिरिक्त ऊसामुळे ऊस तोडणीचे नियोजन करताना कारखान्याना नाकी नऊ आले होते. यामुळे ऊस तोडणी वेळेवर होत नव्हती. परिणामी ऊस उत्पादकांना मोठा फटका बसत होता.

यां परिस्थितीचा फायदा घेत ऊस तोडणीचे मजूर आणि मुकादम तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी सुरू केली. म्हणजेच शेतकऱ्यांची सुधारित पद्धतीने पिळवणूक केली जात होती. यामुळे ऊस बागायतदारांनी यासंदर्भात वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या.

यामुळे यंदा गेल्यावर्षीप्रमाणे ऊस तोडणीसाठी मजुरांनी तसेच मुकादमाने पैशांची मागणी शेतकऱ्यांकडे करू नये यासाठी प्रत्येक कारखान्याला एक तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. साहजिकच यामुळे मजुरांवर आणि मुकादमावर वचक राहणार आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांकडे जर मुकादम किंवा ऊस तोडणी मजुरांकडून पैशाची मागणी करण्यात आली तर त्यांनी संबंधित तक्रार निवारण अधिकारीकडे तक्रार केली पाहिजे.

कारखानानिहाय तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर खालीलप्रमाणे :- 

कर्मवीर कुंडलिकराव जगताप (कुकडी, श्रीगोंदा) ः एस. बी. कुटाळ- ९५५२५२१०२१

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) ः जी. बी. शिंदे -९३२६२६५८५०

मारुतराव घुले (भेंडा) ः सुरेश आहेर – ९६५७७२१४१०

अंबालिका (राशीन) ः विठ्ठल भोसले -९३०७३२२३१९

प्रसाद शुगर (वांबोरी) ः भरत काळे- ८००७०७८४१३

युटेक शुगर (संगमनेर) ः तांबे – ७७९८९६३४००

कर्मवीर शंकरराव काळे (कोळपेवाडी) ः व्ही. व्ही. कापसे – ८२०८४४२१३६

अशोक सहकारी (श्रीरामपूर) ः नारायण चौधरी – ८२०८८६७६५५

संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर (बोधेगाव) ः अभिमन्यू विखे – ९३७०९०११२७

क्रांती शुगर (देवीभोयरे) ः जाधव -७०२८०३८१८१

जयश्रीराम (हळगाव, जामखेड) ः पडवळ – ९९७०००८९२८

पद्मश्री विखे पाटील (राहाता) ः एन. जी. चेचरे – ९४२०४९४९८१

गणेश सहकारी ः एस. एस. गमे – ९२८४६८९२८९

सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ः सचिन बागल- ९८५४५०४९९९

मुळा सहकारी (सोनई)- व्ही. एच. फाटके – ९६५७०६०९४२

अगस्ती (अकोले) ः सयाजीराव पोखरकर – ९८८१६८४५५५

वृद्धेश्वर (पाथर्डी) ः के.एस. ढसाळ- ९४२३७५५२०४

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर) ः भाऊसाहेब खर्डे – ७५८८०७७३३

सोपानराव धसाळ (माळकूप, पारनेर) ः शिवाजी जंजिरे – ८८८८१६०००४

गंगामाई (शेवगाव) ः विठ्ठल शिंदे- ९५५२०००७९९

पियुष (नगर तालुका) ः एस.बी.मस्के – ९६२३०००७९९

साजन शुगर (देवदैठण, श्रीगोंदा) ः नवनाथ दरेकर – ९९२२६१९५०४

साईकृपा हिरडगाव ः विकास क्षीरसागर – ९५६१२१४५४६.