Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ सात ठिकाणी धान्य खरेदीसाठी शासनाने सुरू केली हमीभाव केंद्रे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : शासनाकडून शेतीमालाला लावून दिलेल्या हमीभावात शेतमाल खरेदी करण्यासाठी दरवर्षी हमीभाव केंद्रे सुरू केली जातात. शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला शेतमाल विक्री करावा लागू नये यासाठी या शासकीय हमीभाव केंद्रांची सुरवात केली जाते. या हमीभाव केंद्रांचा शेतकऱ्यांना आधार मिळत असतो.

यामुळे शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला शेतमाल विकावा लागत नाही. अहमदनगर जिल्ह्यातही धान्य खरेदीसाठी शासनाकडून हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत. खरीप हंगाम 2022-23 मध्ये मुंग उडीद व सोयाबीन या शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र सुरू केली असून यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे.

या हमीभाव केंद्रांवर खरेदी देखील सुरू झाली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, केंद्र शासनाने मुगासाठी 7 हजार 755 रुपये, उडदासाठी 6 हजार 600 व सोयाबीनसाठी 4 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे हमीभाव निश्चित केलेले आहेत.

आता या दरात शेतकरी बांधवांना शासकीय केंद्रांवर आपला शेतमाल विक्री करता येणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शासनाने हमीभाव केंद्रे सुरू केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, पाथर्डी, कर्जत, राहुरी, साकत, मांडवगण व बोधेगाव या सात ठिकाणी धान्य खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

शेतकरी बांधवांना हमीभाव खरेदी केंद्रावर आपला शेतमाल विक्री करण्यासाठी नोंदणी करणे अपरिहार्य आहे. यासाठी हमीभाव खरेदी केंद्रावर 4 नोव्हेंबर पासून शेतमाल नोंदणी  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या वर्षातील हमीभाव खरेदी केंद्राचा हंगाम 10 नोव्हेंबर ते 7 फेब्रुवारी 2023 असा राहणार आहे. म्हणजेच 10 नोव्हेंबर पासून या खरेदी केंद्रावर कधी सुरू होणार असून 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत खरेदी केली जाणार आहे.

हमीभाव केंद्रावर शेतकरी बांधवांना शेतमाल नोंदणीसाठी काही कागदपत्र आवश्यक असतात. यामध्ये संबंधित शेतकर्‍यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा, चालू हंगामातील ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला 8 अ, बॅक पासबुक, धनादेश छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रांचा समावेश होतो. ज्या शेतकरी बांधवांना हमीभाव केंद्रावर नोंदणी करायची असेल त्यांनी वर नमूद केलेले कागदपत्र घेऊन जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.