Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! रब्बी पाटपाणी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Ahmednagar News : सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासन दरबारी देखील शेतकऱ्यांना पाणी साठी सोय करणे हेतू लगबग होत असल्याचे चित्र आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पेरण्या सुरु केल्या आहेत. तर काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या येत्या काही दिवसात संपणार आहेत. रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता भासणार आहे. जमिनी विना शेती होऊ शकते मात्र पाण्याविनाश शेती अशक्य आहे.

प्रशासनाला देखील या बाबीची जाणीव आहे हेच कारण आहे की, जिल्ह्यातील शेतीसाठी महत्वाचा कालवा गोदावरी बाबत एक मोठ अपडेट हाती आलं आहे. गोदावरी कालवे रब्बी हंगाम पाटपाणी नियोजनासाठी नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज दि. ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisement

यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीत पाणी मागणी अर्ज भरावेत, असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्याकडून करण्यात येत आहे. खरं पाहता, सध्या बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी बांधवांची रब्बी हंगामातील पेरणी झाली आहे तर काही शेतकरी बांधवांचे पेरणीपूर्व मशागतीचे कामे सुरु आहेत.

साहजिकच या शेतकरी बांधवांना येत्या काही दिवसात रब्बी पिकांसाठी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. या अनुषंगाने नाशिक पाटबंधारे विभागाने नमुना नंबर 7 वर पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबर पर्यंत संबंधितांना सादर करण्याचे आवाहन केले होते. यासाठी विभागाकडून एक पत्रक देखील जारी झालं होतं.

दरम्यान या अर्जासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली जावी यासाठी भाजपाच्या प्रदेशाची स्नेहलता कोल्हे यांनी निवेदन दिले होते. अखेर विभागाने या निवेदनाचा मान ठेवत 30 नोव्हेंबर असलेली शेवटची मुदत ही 30 डिसेंबर पर्यंत ढकलली आहे.

Advertisement

अर्थातच आता शेतकरी बांधवांना 30 डिसेंबर पर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करता येणार आहेत. या मुदतवाढीबाबतचे पत्र गोदावरी उजवा व डावा कालवा उपविभाग व शाखा कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. शेतकरी बांधवांनी नमुना नंबर ७ वर पाणी मागणी अर्ज भरून विभागाकडे जमा करावा.