सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामाच्या पेरण्यांची तयारी सुरू असून बऱ्याच ठिकाणी पेरण्या पूर्ण होत आले आहेत तर काही ठिकाणी पेरण्याची लगबग दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे बियाण्याच्या खरेदीच्या धावपळीत आपल्याला दिसून येत आहेत. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामात सोयाबीनची लागवड केली जाते व अशीच लागवड ही नगर जिल्हात देखील मोठ्या प्रमाणावर होते.
नगर जिल्ह्यामध्ये देखील खरीप हंगामाच्या पेरण्यांची सध्या लगबग सुरू असून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे बियाणे व खतांची कमतरता भासू नये याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून देखील चोख नियोजन करण्यात आलेले आहे.
तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी उन्नती योजना अंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा व त्यासोबत ग्राम बिजोत्पादन योजनेच्या माध्यमातून खरीप हंगामा करिता महाबीज कडून कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मिळाले अनुदानावर
याबाबत सविस्तर वृत्त असो की, नगर जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पेरण्याची धावपळ सुरू आहे व कृषी विभागाच्या माध्यमातून देखील बियाणे व खतांची नियोजन करण्यात आलेली आहे. त्यासोबतच कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी उन्नती योजनेअंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा व त्यासोबत ग्राम बिजोत्पादन योजनेअंतर्गत खरीप हंगामा करिता महाबीजमार्फत नगर कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 26900 शेतकऱ्यांना तब्बल आठ हजार 70 क्विंटल सोयाबीन बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
किती आहे नगर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र?
नगर जिल्ह्यामध्ये जर आपण खरिपाचे सरासरी क्षेत्र पाहिले तर ते सहा लाख 74 हजार हेक्टर आहे व या एकूण क्षेत्रापैकी सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 87 हजार 330 हेक्टर आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन लागवडीत वाढ होताना दिसून येत आहे व यावर्षी एक लाख 88 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल असे नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. सध्या जर आपण नगर जिल्ह्याचा विचार केला तर फक्त दोन टक्क्यांवर खरिपाची पेरणी पूर्ण झालेली आहे.
नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती मिळाले अनुदानावर सोयाबीन बियाणे?
कृषी उन्नती योजना व ग्रामबिजोत्पादन योजना या दोन्हींच्या माध्यमातून कृषी विभागाने शेतकऱ्यांना सोयाबीनचे फुले संगम या वाणाचे बियाणे उपलब्ध करून दिलेली आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून फुले संगम या वाणाच्या आठ हजार 70 क्विंटल सोयाबीन बियाण्याचे वाटप करण्यात आलेले आहे. जर आपण तालुका निहाय आकडेवारी पाहिली तर
नगर तालुक्यात 835 क्विंटल, पारनेर 434 क्विंटल, पाथर्डी 128 क्विंटल, कर्जत 11 क्विंटल, जामखेड 951 क्विंटल, श्रीगोंदे 94 क्विंटल, श्रीरामपूर सातशे क्विंटल, राहुरी 385 क्विंटल, नेवासे 515 क्विंटल, शेवगाव 63 क्विंटल, संगमनेर 938 क्विंटल, कोपरगाव 1089 क्विंटल तर अकोले 845 क्विंटल इतके बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळाले आहे.
किती मिळत आहे शेतकऱ्यांना अनुदान?
शेतकऱ्यांना सोयाबीनच्या फुले संगम वाणाच्या 30 किलोची बॅग ही साधारणपणे 2400 रुपयाला मिळत आहे व यासाठी शेतकऱ्यांना सहाशे रुपये अनुदान मिळत आहे. शेतकऱ्यांना ही बॅग 1800 रुपये देऊन विकत घ्यावी लागत आहे व त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी चांगल्यापैकी हातभार लागला आहे.