अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ सात ठिकाणी शेतीमालाची हमीभावाने खरेदी ! 7 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन ; मका, बाजरीला मिळतोय ‘इतका’ हमीभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्याची देखील योजना आहे.

शासनाकडून शेतकऱ्यांचा शेतीमाल एका ठराविक किमतीत खरेदी केला जातो जेणेकरून खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लुटमार होऊ नये. दरम्यान शासनाने मका आणि बाजरी या शेतीमालासाठी देखील हमीभाव जाहीर केला आहे. शेतकरी बांधवांकडून हमीभावात शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्र दरवर्षी सुरू केले जातात.

यावर्षी देखील हमीभाव केंद्रे सुरू झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण सात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या हमीभाव केंद्रांवर शेतकरी बांधवांना 7 डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्यासाठी आता मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच सदर हमीभाव केंद्र 31 जानेवारी 2023 पर्यंत शेतमालाची हमीभावात खरेदी करणार आहेत.

म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत हमीभावावर खरेदीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. खरं पाहता आम्ही भावाने मका आणि बाजरी खरेदी करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच माहिती अभावी शेतकरी बांधवांना विहित कालावधीमध्ये नोंदणी करता आले नाही.

यामुळे शासनाने ही मुदत वाढून 7 डिसेंबर एवढी केली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून 31 जानेवारी 2023 पर्यंत मका आणि बाजरी खरेदी केली जाणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की शासनाने 1962 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव मकासाठी लावून दिला आहे. तसेच बाजरीसाठी 2350 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात या ठिकाणी सुरू आहेत हमीभाव केंद्र 

राहुरी तालुका खरेदी-विक्री संघ, जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था (पाथर्डी), कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी (कर्जत), सुखायु ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (बोधेगाव- शेवगाव), श्रीराम बि बीयाणे उत्पादक सहकारी संस्था (साकत अहमदनगर), कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व तुळजा मेन्स स्टेट लेव्हल को-ऑप सोसायटी (श्रीरामपुर) या ठिकाणी शासनाकडून मका व बाजरी खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान ज्या शेतकरी बांधवांना हमीभावात मका आणि बाजरी विक्री करायची असेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे.