बळीराजाची क्रूर चेष्टा ! अतिवृष्टीमुळे नुकसान 45 हजाराचं भरपाई 5,440 रुपये ; मदत म्हणावं की जखमेवर मीठ चोळण

Ativrushti Nuksan Bharpai : महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या मदतीत दुपटीने वाढ केली आहे.

खरं पाहता खरीप हंगामात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. सोयाबीन कापूस समवेतच खरीप हंगामातील सर्वच पिकांना याचा फटका बसला आणि शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची एकरी 45 हजाराचे तर सोयाबीन उत्पादकांचे एकरी 20 हजाराचे नुकसान झाले. आता शासनाने नुकसान भरपाई मध्ये वाढ केली असून हेक्टरी तेरा हजार 600 रुपये अर्थातच एकरी पाच हजार 440 रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच त्या कापूस उत्पादकांचे नुकसान 45 हजाराचे अन ज्या सोयाबीन उत्पादकांचे एकरी नुकसान वीस हजाराचे झाले आहे त्यांना 5440 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

यामुळे याला नुकसान भरपाई म्हणावी की जखमेवर मीठ चोळणे असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. खरं पाहता आत्तापर्यंत राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या निकषानुसार प्रति हेक्टरी सहा हजार आठशे रुपयांची मदत मिळत होती. यामध्ये दुपटीने वाढ झाली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 13600 दिले जाणार आहेत. तसेच क्षेत्र मर्यादा वाढवण्यात आली आहे म्हणजेच आधी शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टर शेत जमिनी पुरतेच नुकसान भरपाई मिळत होती मात्र आता तीन हेक्टर शेतजमीनपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

निश्चितच आधीच्या तुलनेत यामध्ये वाढ झाली असून शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळेल. पण प्रत्यक्षात झालेलं नुकसान आणि मिळणारी नुकसान भरपाई याची जर तुलना केली तर नुकसान भरपाई दिली नाही तर ते अधिक योग्य होईल असा खोचक सल्ला शेतकरी सरकारला देत आहेत.

खरं पाहता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देणे हे शासनाचे कर्तव्य मात्र दिली जाणारी मदत ही जर इतकी कमी असेल तर तिला मदत कशी बर म्हणावं असं देखील शेतकरी मत व्यक्त करत आहेत.

खरं पाहता राज्यात सोयाबीन आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय असून या दोन पिकांनाच अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांना अधिकचा उत्पादन खर्च करावा लागला आहे आणि उत्पादन देखील खूपच कमी आले आहे. उत्पादनात 50 ते 65 टक्क्यांपर्यंतची घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा आहे.

शेतकऱ्यांच्या मते, ज्या शेतात दहा क्विंटल पर्यंत एकरी कापसाचे उत्पादन होत होते त्याच शेतात यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे चार क्विंटलचं उत्पादन मिळाल आहे. शिवाय उत्पादन खर्च गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढला आहे. म्हणजेच मिळालेल्या उत्पादनातून उत्पादन खर्च देखील सुटणार नाही. साहजिकच शासनाची ही नुकसान भरपाई किंवा मदत शेतकऱ्यांना तोकडी भासत आहे.