मुहूर्त सापडेना ! अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा पैसा प्रशासनाकडे येऊनही हजारो शेतकरी मदतीपासून वंचित

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. खरं पाहता यावर्षी मान्सूनने उशिरा आगमन केले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांची दैना उडवली.

या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे वावरात उभी असलेली पिके पाण्याखाली आली. परिणामी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भ्रूदंड सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संबंधित बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाई देऊ करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच रक्कम मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र अकोला जिल्ह्यात अजून हजारो शेतकरी असे आहे ज्यांना अतृष्टीची नुकसान भरपाई किंवा मदत मिळालेली नाही. जिल्ह्यासाठी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 134 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मदत म्हणून प्रशासनाला मिळाली असून गेल्या महिन्यापासून हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

25 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील एक लाख वीस हजार 188 बाधित शेतकऱ्यांपैकी 96 हजार 428 शेतकऱ्यांनाच मदत वितरित करण्यात आली आहे. 23 हजार 760 शेतकरी बांधव अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे या बाधित शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या मुहूर्तावर मदत मिळणार आहे असा सवाल उपस्थित झाला आहे.

निश्चितच प्रशासनाकडून कासवगतीने मदतीचे वाटप सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर हा निधी सुपूर्द झाला असून तालुकास्तरावरून हा निधी संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना संबंधित निधी मिळाला देखील आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात 23 हजार 760 शेतकरी बांधव मदतीपासून वंचित असून लवकरच या शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.