बीट लागवडीने ‘या’ तरुण शेतकऱ्याला केले मालामाल! 6 एकर लागवडीतून मिळवले 17 लाख रुपये उत्पन्न, वाचा कसे केले शक्य?

शिरूर तालुक्यातील धामारी या गावचे चंद्रकांत डफळ या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर ती इतर तरुणांना आणि शेतकऱ्यांना देखील खूप प्रेरणा देणारी अशी आहे.या तरुण शेतकऱ्याने बीट लागवडीतून तब्बल लाखोत उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.

Ajay Patil
Published:
beet lagvad

Beet Lagvad:- आजकालची तरुणाई कुठल्याही क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात किंवा कुठलीही नवीन गोष्ट करण्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर इंटरेस्ट दिसून येतो. तसाच इंटरेस्ट किंवा आवड अशा तरुणांना कृषी क्षेत्रामध्ये देखील असल्याचे दिसून येत आहे. सध्या नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्याने अनेक उच्चशिक्षित तरुण देखील आता शेती क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून त्या दृष्टिकोनातून शेती क्षेत्राचे देखील रूपडे पालटायला खूप मोठी मदत झालेली आहे.

कारण असे नव्याने आलेले हे उच्चशिक्षित तरुण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून अगदी कमीत कमी क्षेत्र आणि कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवताना दिसून येत आहेत.त्यामुळे येणारा काळ हा शेती क्षेत्राचा असेल असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण शिरूर तालुक्यातील धामारी या गावचे चंद्रकांत डफळ या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर ती इतर तरुणांना आणि शेतकऱ्यांना देखील खूप प्रेरणा देणारी अशी आहे.या तरुण शेतकऱ्याने बीट लागवडीतून तब्बल लाखोत उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.

सहा एकर बीट लागवडीतून मिळवले 17 लाख रुपये उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरूर तालुक्यातील धामारी या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले चंद्रकांत ढफळ यांनी शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर शेती करावी असे ठरवून शेतीमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर मात्र शेतीमध्ये विविध पीक प्रयोग करायला त्यांनी सुरू केले व अशाच प्रकारचे प्रयोग करत असताना या वर्षी त्यांनी बीट लागवड करण्याचे ठरवले होते.

तसे पाहायला गेले तर त्यांनी शेपू तसेच कोथिंबीर व मेथी यासारखी कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या पालेभाजी वर्गीय पिकांची लागवड करून देखील चांगला पैसा मिळवलेला होता व त्यातच बीट लागवडीचा निर्णय त्यांच्या आयुष्याला खूप टर्निंग पॉईंट देणारा ठरला.

बीट लागवडी मागील जर त्यांचा विचार बघितला तर हे कमीत कमी कालावधीत येणारे पीक असून बीट पिकाची त्यांनी लालीमा या वाणाची लागवड करण्याचा निर्णय घेतला व सहा एकरमध्ये जवळपास 200 ग्रॅमचे 60 डबे इतके बियाण्याचे लागवड केली.

अशाप्रकारे केले नियोजन
चंद्रकांत यांनी बीट पिकाचे व्यवस्थापन करताना पाणी आणि हवामान त्यासोबतच उष्णता इत्यादी कारकांचा अभ्यास करून त्याप्रमाणे औषध फवारणीचे नियोजन केले. सगळे व्यवस्थापन चोखपणे पार पाडल्यामुळे सहा एकर शेतीमध्ये त्यांना तब्बल 70 टन इतके बीटाचे भरघोस असे उत्पन्न मिळाले.

त्यांनी लालीमा या वाणाची लागवड केल्यामुळे शिरूरसह पुणे जिल्हा व इतर राज्यात देखील त्याला प्रचंड मागणी प्राप्त झाली.साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये बीट काढणीस तयार झाल्यावर या जिल्ह्याची मालाची असलेली मागणी व पुरवठ्याचा तुटवडा बघता या वाणाला आजपर्यंतचा सर्वोच्च दर म्हणजेच किलोला 24 रुपये 50 पैसे दर जागेवरच मिळाला.

मालाची कॉलिटी दर्जेदार असल्यामुळे पुणेसह इतर राज्यात देखील हे बीट विक्री करता पाठवले. या पद्धतीने सहा एकर मधून 17 लाखांचे उत्पन्न मिळवण्यामध्ये त्यांना यश मिळाले आहे. या सहा एकर बीट पिकाकरिता त्यांनी चार लाख रुपये खर्च केलेला होता व निव्वळ नफा त्यांना 13 लाख रुपये मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe