Bottle Gourd Farming : भोपळ्याच्या ‘या’ सुधारित जातींची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bottle Gourd Farming : भोपळा ही एक वेलीवर्गीय प्रकारातील एक भाजीपाला पिक आहे. खरं पाहता, भोपळा फक्त भाजीच बनवन्यासाठी वापरला जात नाही तर रायता हलव्यापासून स्वादिष्ट मिठाई देखील यापासून बनवली जाते.

हिरव्या भाज्यांमध्ये भोपळा खूपच लोकप्रिय आहे. भोपळ्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. यामुळे भोपळ्याला बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत या पिकाची लागवड शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमावून देत आहे.

विशेष म्हणजे भोपळा पिकाची शेती फारशी अवघड देखील नाही. योग्य हवामान आणि योग्य माती उपलब्ध असल्यास हे पिक चांगले वाढते आणि उत्पादन देखील चांगले बक्कळ मिळते. इतर पिकांप्रमाणेच भोपळ्याच्या देखील अनेक जाती आहेत. यामध्ये अनेक अशा सुधारित जाती आहेत ज्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना बक्कळ उत्पादन मिळणार आहे.

खरं पाहता अलीकडे भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागले आहे. भोपळा पिकाची देखील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करतात. त्यामुळे आज आपण भोपळ्याच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अर्का नूतन :- भोपळ्याची ही एक सुधारित जात म्हणून ओळखले जाते. या जातीच्या भोपळ्याचे उत्पादनही चांगले आहे. जाणकार लोकांच्या मते, हेक्टरी 46 टनांपर्यंत उत्पादन मिळते आणि या जातींचे भोपळा पिक मात्र 56 दिवसांत तयार होते. हे फिकट हिरव्या रंगाचे आणि लांब असते. निश्चितच अवघ्या दोन महिन्यात या जातीच्या भोपळा पिकातून शेतकऱ्यांना चांगले बक्कळ उत्पन्न मिळणार आहे.

अर्का श्रेयस :- भोपळ्याच्या ही एक सुधारित जात आहे. या जातींपासून हेक्टरी 48 टनांपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भोपळ्याची ही जात लांब नसून थोडी गोलाकार आणि जाड असते. ही एक खुली परागकण जात आहे जी 60 दिवसांत तयार होते. निश्चितच ही जात देखील दोन महिन्यात तयार होत असते आणि अवघ्या दोन महिन्यात या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.

अर्का बहार :- भोपळ्याच्या या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. याची पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना दोनदा चांगले उत्पन्न मिळत आहे. या जातीचा रंग हलका हिरवा असतो आणि या जातीचे पिक 50 ते 60 दिवसांत तयार होते. उत्पादनाचा विचार केला तर या जातीपासून 450 ते 500 क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.