Business Idea: भावांनो कोट्याधीश बनायचं ना..! मग ‘या’ काटेरी वनस्पतीची शेती करा, करोडोत खेळणार, ऐशोआरामात राहणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea: शेतकरी मित्रांनो (Farmer) गल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते विदेशातील गल्ली आता जागतिकीकरणामुळे जवळ आली आहे. सांगायचा अर्थ असा की आता जागतिकीकरणामुळे शेती मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकते. अशा परिस्थितीत विदेशात ज्या पिकांची मागणी असते त्या पिकांची शेती (Farming) सुद्धा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

मित्रांनो आजही अशा अनेक वनस्पती (Medicinal Plant) आहेत ज्या दुर्लक्षित आहेत यामध्ये कॅक्टस (Cactus Farming) या वनस्पतीचा देखील समावेश आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कॅक्टस या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात त्यामुळे याची बाजारात मोठी मागणी आहे. मेक्सिको सारख्या देशाने ही बाब ओळखली आहे आणि मेक्सिकोमधील बहुतांशी शेतकरी कॅक्टसची व्यावसायिक शेती (Medicinal Plant Farming) करत आहेत.

मित्रांनो जाणकार लोकांच्या मते कॅक्टस या वनस्पतीचा पशुखाद्य म्हणून तसेच चामडे बनवण्यासाठी तसेच विविध प्रकारचे औषधे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.  एवढेच नाही तर अनेक लोक कॅक्टसचे सेवन करतात या पासून वेगवेगळे पदार्थ बनवतात तसेच कॅक्टसचा इंधनात देखील वापर होतो. निश्चितच कॅक्टसची मागणी देखील दिवसेंदिवस वाढणार आहे.

एवढेच नाही तर कृषी क्षेत्रातील जाणकार लोक दावा करतात की, कॅक्टस ही पर्यावरणासाठी अतिशय अनुकूल वनस्पती आहे यामुळे पर्यावरणाचे संतुलन देखील राखले जाते. ही वनस्पती प्रदूषित वातावरणातील कार्बन मोनॉक्साईड शोषून घेते. शिवाय गंभीर दुष्काळात निवडुंगाच्या म्हणजेचं कॅक्टसच्या लागवडीतून जनावरांच्या आहाराची देखील पूर्तता भागवता येणार आहे. कारण की या वनस्पतीला वाढीसाठी खूपच कमी पाणी लागते कारण की ही वनस्पती वाळवंटी प्रदेशात आढळते.

कॅक्टसची व्यावसायिक शेती

•कॅक्टसच्या अनेक प्रजाती जगभर आढळतात, परंतु व्यावसायिक लागवडीच्या दृष्टिकोनातून अपुंटिया फिकस-इंडिका, ज्याला कॅक्टस पिअर आणि भारतीय अंजीर म्हणून ओळखले जाते.

•निवडुंगाच्या या जाती काट्यांपासून मुक्त असतात आणि त्यांच्या लागवडीसाठी अत्यल्प पाणी लागते.

•हेच कारण आहे की पाण्याची बचत करूनही, निवडुंग हा पशुखाद्य आणि जैव-ऊर्जा किंवा जैव-इंधनचा प्रमुख स्त्रोत आहे.

•कमी पाण्यात उगवणारे निवडुंग हे पाण्याचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, ज्याच्या सेवनाने प्राण्यांना उन्हाळ्यात निर्जलीकरण आणि पाण्याच्या कमतरतेपासून वाचवता येते.

•शेतकर्‍यांना हवे असल्यास निवडुंगाच्या कुंपणाच्या रूपात ते शेताच्या बांधावर निवडुंगाचे सह-पीक करू शकतात, जेणेकरून भटक्या जनावरांनाही शेतात येण्यापासून रोखता येईल.

•मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कॅक्टसच्या या जाती कापणीनंतर पुन्हा निर्माण होतात, ज्याचा वापर रस, मुरंबा, कँडी, लाल रंग तसेच तेल, शाम्पू, साबण आणि लोशन यांसारख्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जाऊ शकतो.