शेतकऱ्यांना करता येईल बंदी असलेल्या या पिकाची शेती! केंद्र सरकारने दिली परवानगी

Ajay Patil
Published:
afu khaskhas crop

भारतामध्ये शेतकरी शेती करत असताना विविध पिकांची लागवड करतात. यामध्ये अनेक विदेशी प्रकारच्या भाजीपालांचे लागवड देखील आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागली असून अनेक प्रकारचे फळबागा लागवड देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करून चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. कारण आता शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांची शेती करणे सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विविध उत्पादनक्षम अशा पिकांची लागवड करण्याकडे मोर्चा वळवला आहे.

परंतु असे असताना देखील भारतामध्ये अशी अनेक पिके आहेत की त्यावर कायदेशीर दृष्ट्या लागवड करण्यावर बंदी आहे. यामध्ये अफू खसखस या पिकाचा देखील समावेश होतो. भारताचा विचार केला तर भारतामध्ये देखील अफू खसखस पिकाच्या लागवडीला बंदी आहे. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून सन 2023-24 या वर्षाकरिता या पिकाच्या लागवडीसाठी परवानगी काही राज्यांसाठी देण्यात आली आहे. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघू.

 या राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिली अफूच्या खसखशीच्या शेतीचे परवानगी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, देशातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एकूण 1.12 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून 2023- 2024 या आर्थिक वर्षासाठी अफूच्या खसखशीच्या शेतीची परवानगी देण्यात आली आहे. जर आपण यामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत विचार केला तर 27000 शेतकरी यामध्ये वाढले असून एकंदरीत आकडेवारी पाहिली तर मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 50500 शेतकरी तर राजस्थानमध्ये 47 हजार व उत्तर प्रदेश राज्यामध्ये दहा हजार पाचशे शेतकरी हे अफूच्या खसखशीचे पीक पिकवणार आहेत.

 अफूचे खसखस पिकाबद्दल माहिती

अफु हे पीक नसते परंतु खसखस हे पीक असते. या पिकाला जेव्हा बोंड येते तेव्हा त्यात चिरा पडला जातो व या चिऱ्यातून जो काही चिकट द्रव्य बाहेर पडतो त्यापासून अफू तयार केले जाते. खसखशीचा वापर जेवणात होतो व ती औषधी असल्याचे देखील म्हटले जाते. खसखस हे पुरातन असे पीक असून साधारणपणे इसवी सन पूर्व 4000 वर्षांपासून खसखस वापरली जाते याचे पुरावे सापडतात.

तीन महिना कालावधीचे हे पीक असून सुपीक व बागायती जमिनीवर ते चांगले पिकते. भारतामध्ये सर्वाधिक हेक्टरी उत्पादन खसखशीचे मिळते. तसेच जागतिक पातळीवर चीन, म्यानमार तसेच अफगाणिस्तान व पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये ही पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच इंग्लंड आणि फिनलँड मध्ये देखील खसखस लागवडीवर बंदी नाही. परंतु त्याचा वापर फक्त औषधी हेतूनेच व्हावा असा त्या ठिकाणी कायदा आहे.

अमेरिकेत मात्र यावर बंदी आहे. जेव्हा युनोच्या माध्यमातून 1984 मध्ये अमली पदार्थांच्या उत्पादनावर बंदी घालण्याचा ठराव झाला तेव्हा 1987 मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये रूपांतर झाले. भारताने 1986 मध्ये याबद्दलचा कायदा केला. परंतु सरकारी परवानगी घेऊन मध्य प्रदेश व राजस्थान तसेच उत्तर प्रदेशात खसखशीची लागवड करता येते परंतु महाराष्ट्रात मात्र खसखस लागवडीवर बंदी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe