Cotton Farming Tips : मित्रांनो भारतात कापूस लागवड (Cotton Cultivation) भल्या मोठ्या क्षेत्रावर केली जाते. आपल्या राज्यात देखील कापसाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांत कापूस लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. खानदेश मधील धुळे नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यात कापसाचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
खरीप हंगामातील (Kharif Season) कापूस एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. मित्रांनो आता कापसाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. या पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 20 हजार हेक्टर क्षेत्रात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे.
यामुळे कापूस पंढरीत यावर्षी चिंतेचे ढग बघायला मिळत आहेत. दरम्यान या वर्षी कापसाला गतवर्षी सारखाच विक्रमी बाजार भाव (Cotton Rate) मिळत असल्याने तसेच आगामी काळात देखील कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव राहणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
यावर्षी कापसासाठी पोषक वातावरण होते शिवाय पाऊस देखील चांगला झाला असल्याने कापसाच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज होता मात्र नंदुरबार जिल्ह्यात कापूस पिकावर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे यामुळे शेतकरी बांधवांची सर्व आशा पाण्यात गेली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोणकोणत्या उपाययोजना (Cotton Crop Management) केल्या पाहिजेत. तसेच हा रोग (Cotton Disease) कापूस पिकावर येऊच नये यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या पाहिजेत याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कापसाची पाने लाल पडतात आणि पानगळ होत असते. या रोगात पानांची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्याने झाडाचे पोषण मंदावत असून याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. निश्चितच यामुळे उत्पादनात भली मोठी घट घडून येते. या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर उत्पादनात भरून न निघणारी घट घडते.
लाल्या रोग येण्याची कारणे
- मित्रांनो अन्नद्रव्याची कमतरता असल्यास प्रामुख्याने हा रोग कापूस पिकावर बघायला मिळतो.
- तसेच पिकांची फेरपालट न केल्यास हा रोग होऊ शकतो. म्हणजे गेल्या वर्षी कापसाची लागवड केली असेल अन यावर्षीदेखील त्याच जमिनीवर कापसाची लागवड केली असेल तर हा रोग होऊ शकतो.
- कापसाच्या शेतात पाणी साचल्यामुळे तसेच पाण्याचा लवकरात लवकर निचरा न झाल्यामुळे हा रोग येऊ शकतो. याशिवाय पाण्याचा ताण जरी निर्माण झाला तरी देखील हा रोग होऊ शकतो.
- कापूस पीक जेव्हा बोंडा अवस्थेत असते तेव्हा त्याला नत्राची सर्वाधिक गरज असते. मात्र त्यावेळी कापूस पिकाला आवश्यक नत्र मिळाले नाही तरी देखील मूलद्रव्यांची कमतरता म्हणून कापसाची पाने लाल पडतात म्हणजेच लाल्या रोग येतो.
- याशिवाय कापूस पिकावर रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव असल्यास लाल्या रोग येऊ शकतो.
लाल्या रोगावर नियंत्रण तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना
- जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसाची लागवड अतिशय हलक्या जमिनीत करणे टाळावे.
- ज्या जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होत नाही अशा जमिनीत कपाशीचे पीक घेऊ नये असा सल्ला जाणकार देत असतात. जर शेतकरी बांधवांनी अशा जमिनीत कापसाची लागवड केली तर शेतात पाणी साचले की लगेचच शेतातून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
- कपाशीच्या पिकाला खतांच्या मात्रा तज्ञांच्या सल्ल्याने आणि संतुलित प्रमाणात देण्याचा सल्ला दिला जातो. कोरडवाहू पिकासाठी नत्राची मात्रा दोनदा विभागून द्यावी. बागायती क्षेत्रासाठी तीनदा नत्राची मात्रा विभागून द्यावी.
- कपाशी पिकाच्या महत्वाच्या अवस्थेमध्ये डीएपी आणि युरिया खताचा वापर करावा यासाठी तज्ञांचा सल्ला आवश्यक राहणार आहे.
- सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून देखील लाल्या रोग कपाशी पिकावर आल्यास या रोगाचे रासायनिक पद्धतीने देखील नियंत्रण केले जाते. यासाठी 40 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति दहा लिटर पाणी अस प्रमाण घेऊन पिकावर फवारावे. याच्या दोन ते तीन फवारण्या कराव्या लागणार आहेत. किंवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट दिले जाऊ शकते. मात्र यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला घ्यावा लागणार आहे.
- याशिवाय कपाशी पिकावर लाल्या रोग हा रस शोषक कीटकांमुळे येतो. या परिस्थितीत कपाशी पिकावर रस शोषक किडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे आढळून आल्यास या किडिंवर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. यासाठी फिफ्रोनिल 20 मिली किंवा 10 मिली इमिडाक्लोप्रिड किंवा 20 मिली बुप्रोफेझिन(25 एस सी) प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मात्र, कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर तज्ञ लोकांचा सल्ला घेणे अत्यावश्यक राहणार आहे.