Cotton Variety: कपाशीच्या ‘या’ व्हरायटींची कराल लागवड तर मिळेल लवकर पैसा! लागवडीनंतर काढणीला येतात लवकर, वाचा वैशिष्ट्ये

cotton crop

Cotton Variety:- खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कपाशी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कपाशी हे खरीप हंगामातील एक प्रमुख पीक असून हे एक नगदी पीक असल्याने मोठ्या भागावर कपाशी पिकाची लागवड होते. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कपाशीचे अनेक व्हरायटी असून त्यातील दर्जेदार आणि चांगले उत्पादन देणाऱ्या व्हरायटींची निवड प्रत्येक शेतकरी लागवडीसाठी करतो.

कारण दर्जेदार उत्पादन देणाऱ्या व्हरायटींची लागवड जर केली तर उत्पादन देखील चांगले मिळते व हातात पैसा देखील चांगला मिळतो. या दृष्टिकोनातून कपाशीच्या व्हरायटींना खूप महत्त्व असते. त्यातल्या त्यात कपाशीच्या काही व्हरायटी या लागवडीनंतर लवकर काढणीस तयार होतात

व अशा व्हरायटिंची  लागवड केली तर लवकर उत्पादन मिळून शेतकऱ्यांना बाजार भाव देखील चांगला मिळू शकतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण  कपाशीच्या अशा व्हरायटींची माहिती घेणार आहोत की ज्यांची लागवड केल्यानंतर त्या लवकर काढणीला तयार होतात.

 कपाशी पिकाच्या या व्हरायटी होतात काढणीस लवकर तयार

1- राशी 659- केल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये राशी 659 ही व्हरायटी खूपच प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या व्हरायटीची लागवड करतात. तज्ञांच्या मतानुसार बघितले तर या व्हरायटीपासून  लागवडीनंतर साधारणपणे 155 ते 160 दिवसांमध्ये उत्पादन मिळायला सुरुवात होते.

कोरडवाहू भागामध्ये या जातीपासून चांगले उत्पादन मिळत असून या जातीचे पीक कापूस वेचणीला देखील सोपे आहे असे म्हटले जाते. परंतु कपाशीच्या या व्हरायटीचे काळ्या कसदार जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे देखील म्हटले जाते.

2- राशी निओ कपाशीच्या या व्हरायटी पासून मिळणाऱ्या कापसाचा धागा हा मध्यम असतो व तो 27 एमएमचा असतो. या व्हरायटीचे पीक 155 ते 165 दिवसात काढणीस तयार होते. कपाशीचा हा वाण हलक्या जमिनीसाठी योग्य आहे. परंतु बागायती आणि भारी जमिनीमध्ये या जातीपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे बोलले जाते.

3- अजित 155- कपाशीची ही व्हरायटी बागायती आणि जिरायती या दोन्ही क्षेत्रांसाठी लागवडीस फायद्याची आहे. साधारणपणे लागवडीनंतर अजित 155 ही व्हरायटी 160 दिवसात काढणीस तयार होते. अगदी हलक्या जमिनीमध्ये लागवड केली तरी देखील ती बारा क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकते.

4- कबड्डी महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अशी व्हरायटी असून उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मात्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या व्हरायटीच्या कापसाच्या बोंडाचे वजन सात ते आठ ग्रॅम एवढे असते व लागवडीनंतर साधारणपणे 160 दिवसात काढणीस तयार होते.

कबड्डी ही व्हरायटी जिरायती आणि बागायती अशा दोन्ही भागांमध्ये लागवडीस उपयुक्त असून हलक्या जमिनीत सहा ते सात क्विंटल, मध्यम जमिनीमध्ये आठ ते नऊ क्विंटल आणि भारी जमीन असेल तर दहा ते अकरा क्विंटलचा उतारा मिळतो. बागायती जमिनीमध्ये लागवड केली तर 17 ते 18 क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन देखील मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe