Dairy Business Loan: 13 लाखांच्या कर्जावर मिळवा साडेचार लाखांचे अनुदान व सुरू करा दूध डेअरी व्यवसाय! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dairy Business Loan:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राचा विकास होणे खूप गरजेचे आहे. कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकारकडून नवनवीन योजनांची घोषणा केली जाते व या योजनांची अंमलबजावणी देखील केली जाते. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी निगडित असलेली महत्त्वाची बाब म्हणजे कृषीशी संबंधित असलेले जोड व्यवसाय हे होय.

जोडधंद्यांमध्ये पशुपालन आणि त्या अंतर्गत येणारा दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय देखील खूप महत्त्वाचा असून या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत एक नवीन घोषणा केली असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी मिळावा याकरिता 30 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे.

एवढी नक्कीच या निधीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या अनुषंगाने नाबार्ड योजना नेमकी काय आहे किंवा तिचा लाभ कोणाला मिळणार? इत्यादी बद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.

 सरकारच्या नाबार्ड योजनेचा फायदा कोणाला मिळतो?

केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नाबार्ड योजनेचा लाभ हा उद्योजक, शेतकरी तसेच स्वयंसेवी संस्था, शेतकऱ्यांचे संघटित गट तसेच छोट्या-मोठ्या कंपन्या आणि असंघटित क्षेत्र इत्यादींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

 दुग्ध व्यवसाय योजनेच्या माध्यमातून कुठल्या संस्थांकडून कर्ज दिले जाते?

या दुग्ध व्यवसाय योजना म्हणजेच डेअरी फार्म योजनेच्या माध्यमातून व्यवसायिक बँका तसेच प्रादेशिक बँका, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका व नाबार्ड कडून पुनर्वित्तासाठी पात्र असलेल्या इतर संस्थांच्या माध्यमातून कर्ज दिले जाते.

 नाबार्डच्या या डेअरी योजनेअंतर्गत किती मिळू शकते अनुदान?

या अंतर्गत दुग्ध उत्पादन युनिट सुरू करण्याकरिता डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत अनुदान देखील दिले जात असून या माध्यमातून नाबार्ड डेअरी योजनेद्वारे दूध उत्पादनासाठी आवश्यक प्रक्रिया उपकरणे खरेदी करता येणे शक्य होणार आहे.

म्हणजे साधारणपणे तुम्ही या योजनेच्या माध्यमातून 13 लाख रुपये पर्यंतच्या दुधाच्या उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे खरेदी केल्यास त्यावर तुम्हाला 25% पर्यंत अनुदान म्हणजे साडेतीन लाख रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते. याशिवाय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांकरिता या योजनेमधून साडेचार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.

 या योजनेअंतर्गत बँकेकडून किती रक्कम मंजूर होऊ शकते?

यामध्ये या योजनेअंतर्गत बँकेकडून कर्जाची रक्कम मंजूर केली जाते व 25 टक्के रक्कम लाभार्थ्यांनी त्याचा हिस्सा म्हणून भरणे गरजेचे असते. या योजनेच्या माध्यमातून पाच गाईंसह डेअरी फार्म सुरू करण्याकरिता लाभार्थी नागरिकाला खर्चाचे प्रमाणपत्र द्यावे लागते व त्या माध्यमातून सरकार 50% पर्यंत अनुदान देते.

 नाबार्ड डेअरी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

यामध्ये अर्ज करण्याआधी तुम्हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवणे गरजेचे आहे. नाबार्ड योजनेअंतर्गत डेअरी फार्म उघडायचा असेल तर तुम्हाला त्याकरिता तुमच्या परिसरातील नाबार्ड कार्यालयामध्ये जाणे गरजेचे आहे तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन देखील या संबंधीची माहिती मिळवू शकतात. बँकेमध्ये गेल्यावर तुम्हाला यासाठी असलेला अनुदानाचा फॉर्म भरून या माध्यमातून अर्ज करणे गरजेचे आहे. समजा कर्जाची रक्कम वाढली असेल तर त्या व्यक्तीकडे त्याचा प्रकल्प अहवाल नाबार्डला सादर करणे गरजेचे आहे.

 आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र तसेच बँक खात्याचा कॅन्सल चेक, बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र, डेअरी प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.

 अहमदनगर जिल्हा नाबार्ड कार्यालयाचा पत्ता

फ्लॅट क्रमांक 301, दुसरा मजला, प्रेरणा आर्केड समोर, तारकपूर एसटी बस स्टॅन्ड, अहमदनगर-414 003

 डेअरी उद्योजकता विकास योजना हेल्पलाइन क्रमांक

हेल्पलाइन क्रमांक-022-26539895/96/99