ढोबळी मिरची ‘या’ शेतकऱ्याला देत आहे लाखोत उत्पन्न! सध्या प्रत्येक तोड्याला मिळत आहे 1 लाखाचे उत्पन्न, वाचा कसे केले आहे नियोजन?

बाजारपेठेचा योग्य अभ्यास आणि त्यानुसार केलेली पिकांची लागवड नक्की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. म्हणजेच जे विकेल तेच पिकेल या धर्तीवर जर पीक लागवडीचे नियोजन केले तर शेतकरी उत्तम बाजारभाव मिळवू शकतात व त्या दृष्टिकोनातून कमीत कमी क्षेत्रामध्ये आणि कमी खर्चामध्ये देखील लाखोत उत्पन्न मिळू शकतात.

Ajay Patil
Published:
capsicum chilli crop

Capcicum Chilli Cultivation:- बाजारपेठेचा योग्य अभ्यास आणि त्यानुसार केलेली पिकांची लागवड नक्की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. म्हणजेच जे विकेल तेच पिकेल या धर्तीवर जर पीक लागवडीचे नियोजन केले तर शेतकरी उत्तम बाजारभाव मिळवू शकतात व त्या दृष्टिकोनातून कमीत कमी क्षेत्रामध्ये आणि कमी खर्चामध्ये देखील लाखोत उत्पन्न मिळू शकतात.

अशा पद्धतीने आर्थिक समृद्धी मिळवणारे अनेक शेतकरी आपण बघतो. त्यातल्या त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन मिळण्यास आता शेतकऱ्यांना मदत होऊ लागली आहे व त्याचा देखील फायदा आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करताना होत आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी भाजीपाला पिकांकडे व फळ पिकांकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून त्यातल्या त्यात भाजीपाला पिकांकडे देखील शेतकऱ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भाजीपाला पिकांमध्ये मिरची तसेच वांगी व भेंडी, कारले, दोडके व काकडी सारखी वेलवर्गीय भाजीपाला पिके घेण्याला शेतकरी मोठ्या प्रमाणावर पसंती देत असल्याचे चित्र आहे.

भाजीपाला पिके हे कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न देऊ शकतात व ही क्षमता असल्यामुळेच भाजीपाला पिके शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील केरभाऊ चासकर या प्रयोगशील शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर या शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची लागवडीतून लाखो रुपये मिळवण्याची किमया साध्य केली आहे. यामागे नक्कीच त्यांचे कष्ट व नियोजन महत्त्वाचे आहेच. परंतु अचूक व्यवस्थापनाने देखील तितकीच मोलाची भूमिका पार पाडली आहे.

ढोबळी मिरचीने या शेतकऱ्याला केले लखपती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेगाव तालुक्यातील नागापूर या गावचे प्रयोगशील शेतकरी केरभाऊ बाबुराव चासकर हे प्रयोगशील शेतकरी असून ते नेहमी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात व यावेळी त्यांनी ढोबळी मिरचीचा प्रयोग करण्याचे ठरवले होते.

त्या दृष्टिकोनातून त्यांनी कामाला सुरुवात केली व जवळपास ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संकरित ढोबळी मिरचीच्या जातीची लागवड केली. त्यानंतरच्या कालावधीत मात्र अनेक वेळा प्रतिकूल वातावरण निर्माण झाले व नागापूर परिसरामध्ये महिनाभर सतत पाऊस पडला व धूके इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर सामना करत त्यांनी अथक परिश्रमाने दोन ते तीन दिवसाच्या अंतराने सतत फवारण्या करत ढोबळी मिरचीचे पीक जगवले व आज यातून उत्पादन मिळायला लागले आहे.

याकरिता त्यांनी शेडनेट व पॉलीहाऊसचा वापर केला व यातून दर्जेदार असे मिरचीचे उत्पादन मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे. आज त्यांची ढोबळी मिरची बाजारपेठेत विक्रीला जात असून दहा किलोला 800 ते साडेआठशे रुपये असा विक्रमी बाजारभाव त्यांना मिळत असून एका तोड्याला लाखो रुपयांचे उत्पादन ते मिळवत आहेत.

आतापर्यंत त्यांनी चार ते पाच तोडे पूर्ण केले असून एका तोड्याला एक लाख रुपयांचे उत्पन्न ते घेत आहेत. ढोबळी मिरचीला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने बाजारभाव देखील चांगले मिळताना दिसून येत आहेत व.याचा नक्कीच फायदा चासकर यांना झालेला आहे.

यापुढे देखील चार ते पाच तोडे होतील अशी खात्री त्यांना असून या सगळ्या ढोबळी मिरचीच्या कामांमध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाचे देखील अनमोल असे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे ते संपूर्ण मिरचीची विक्री स्थानिक बाजारातच करत असल्याने वाहतूक खर्च देखील वाचत असल्याने नफ्यात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आखाती देशांमध्ये आहे ढोबळी मिरचीच्या निर्यातीला मोठी संधी
ढोबळी मिरचीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे या मिरचीला वर्षभर जास्तीत जास्त असे बाजारभाव मिळत असतात.

मागणीमुळे ही मिरची आखाती देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. दर्जेदार मिरचीचे उत्पादन घेतले तर आखाती देशांमध्ये असलेल्या मोठ्या मागणीचा फायदा घेऊन या मिरचीची निर्यात शक्य आहे व त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवायला देखील भरपूर वाव आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe