Export Business: कष्टाने पिकवलेला शेतमाल ‘अशा पद्धती’ने विका विदेशात! वाचा परवाना कसा काढावा?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Export Business:- शेतकरी शेतीमध्ये अफाट कष्ट करून आणि रक्ताचे पाणी करून शेतीतून उत्पादन मिळवतात. परंतु बऱ्याचदा बाजार भाव अत्यल्प मिळाल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्किल होते व  शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. ही परिस्थिती भाजीपाला पिकांपासून ते फळ पिकांपर्यंत सगळ्याच ठिकाणी दिसून येते.

याकरिता तयार शेतमाल थेटपणे बाजारपेठेत न विकता त्यावर एक तर प्रक्रिया करून तो विकणे किंवा प्रक्रिया उद्योग उभारणे किंवा शेतीमाल निर्यात व्यवसायातून आर्थिक उन्नती साधने शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे आहे. यामध्ये जर निर्यात व्यवसायाचा विचार केला तर या माध्यमातून तुम्ही फळे व भाजीपाला निर्यात करून खूप मोठा नफा मिळवू शकतात.

यासाठी तुम्हाला या संबंधीचे बारकावे समजून घेणे तसेच काही सरकारी कागदपत्रे देखील तयार करणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या देशांमध्ये कोणता भाजीपाला किंवा फळपिके किंवा फुल पिके आयात केल्या जातात हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल.

 निर्यातीसाठी आवश्यक परवाना अशा पद्धतीने मिळू शकतो

फळे व भाजीपाला निर्यातीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला परवाना आवश्यक आहे. हा परवाना तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अर्थात डीजीएफटी यांच्या माध्यमातून दिला जातो. या परवान्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड च्या तुमच्या जवळच्या कार्यालयामध्ये जाणे गरजेचे आहे

किंवा डीजीएफटीचे संकेतस्थळ https://dgft.delhi.nic.in ला भेट देऊन आणि त्या ठिकाणाहून आयात निर्णय फॉर्म -ANF2A वर क्लिक करून अर्ज करता येऊ शकतो. अर्ज भरताना तुम्हाला पॅन क्रमांक देणे सक्तीचे आहे व यासोबत चालू बँक खाते क्रमांक आणि 1000 रुपये शुल्क भरणे देखील आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणी सोबतच सदस्यत्व प्रमाणपत्र काढून निर्यातीसाठी मान्यता घेणे बंधनकारक आहे.

 डाळिंबाची निर्यात कशी करतात?

डाळिंब उत्पादकांना प्रामुख्याने युरोप देशांमध्ये डाळिंब निर्यात करायचा असतो व अनारच्या मार्फत कृषी विभागाकडे डाळिंब भागांची नोंदणी करणे याकरिता आवश्यक आहे. युरोपियन युनियन आणि  इतर देशांमध्ये ताजी फळे आणि भाजीपाला निर्यात करणाऱ्या उत्पादकांकरता हॉटनेट ट्रेसेबिलिटी सिस्टममध्ये फळबागा किंवा शेतीची नोंदणी तसेच नूतनीकरण करण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते

व या नोंदणी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून वृत्तपत्रे तसेच दूरचित्रवाणी व रेडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी देखील दिली जाते. कृषी विभागाकडे निर्यातीसाठी अर्ज सोबतच बागेचा साईट मॅप आणि गाव नमुना क्रमांक  देखिल आवश्यक असतो तसेच एक हेक्टर डाळिंबाची नोंदणी करण्याकरिता तुम्हाला पन्नास रुपये लागतात. या सगळ्या नोंदणी प्रक्रियेसाठी तालुका कृषी कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते.

या प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अर्ज कृषी मंडळाकडे जमा करावा लागतो व मंडळाच्या कृषी अधिकाऱ्यांनी फळबागांची पाहणी केल्यानंतर पाहणी अहवाल(4अ) फॉर्म मध्ये तयार करून संबंधित शेतकऱ्यांचा प्रस्ताव हा नोंदणीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला जातो. अनारकोड, तालुका कोड, गाव कोड  आणि शेत किंवा प्लॉट कोड हे संगणकाच्या माध्यमातून युरोपीय देशातील संबंधित शेतकऱ्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाते व त्या क्रमांकावर पुढील प्रक्रिया ऑनलाईन पार पाडल्या जातात.

 या व्यवसायात यशस्वी होण्याच्या आवश्यक गोष्टी

या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे सगळ्यात अगोदर म्हणजे गोदामाची योग्य सोय असणे गरजेचे आहे किंवा या ऐवजी तुम्ही कोल्ड स्टोरेज वापरू शकतात. कारण फळे किंवा भाज्या निर्यात करण्याकरिता त्यांचे गुणवत्ता राखली जाणे खूप गरजेचे आहे व गुणवत्ता दर्जेदार ठेवण्यासाठी तुम्ही यावर जितका जास्त खर्च कराल तितका तुमचा व्यवसाय यशस्वी होण्याला मदत होईल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी स्वतःला अपडेट करत आणि देखील खूप महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या उत्पादनांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करणे देखील महत्वाचा मुद्दा यामध्ये ठरू शकतो.