Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता…! 10 म्हशीची डेअरी खोलण्यासाठी मिळणार 7 लाखांचं कर्ज, असा करा अर्ज

Farmer Scheme: भारतात शेती व्यवसायाच्या (Farming) सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पशु पालन (Animal Husbandry) केले जात आहे. राज्यातही शेतकरी बांधव अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी पशुपालन करत असतात.

अशा परिस्थितीत पशुपालक शेतकऱ्यांचे (farmer) उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यासाठी तसेच त्यांना पशुपालन व्यवसायात मदत करण्यासाठी सरकारकडून (Government) अनेक नाविन्यपूर्ण योजना देखील कार्यान्वित केल्या जातात. मित्रांनो जर तुम्हाला देखील डेअरी (Milk Dairy) उघडून स्वतःचा रोजगार करायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास आणि योग्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारची एक अशी योजना आहे, ज्यामध्ये 10 म्हशींची डेअरी उघडण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. यामुळे जर तुम्हाला डेअरी उघडायची असेल तर आपण या कर्जाचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करू शकता.

दुधाच्या उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे आणि इथे दुग्धोत्पादन हे खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. भारत सरकार दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘डेअरी उद्योजक विकास योजना’ यासारख्या विविध योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो. तुमच्याकडे डेअरी उघडण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमचा रोजगार सुरू करू शकता. या योजनेअंतर्गत बँकेकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.

डेअरी उद्योजक विकास योजना काय आहे?

भारतात दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी आणि पशुपालनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे दुग्धउद्योजक विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 10 म्हशींचे दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. याशिवाय शासनाकडून योजनेवर अनुदानही दिले जाते. भारत सरकारने 1 सप्टेंबर 2010 पासून ही योजना सुरू केली आहे.

दुग्धउद्योजक विकास योजनेंतर्गत कर्ज कसे मिळवायचे?

या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि नाबार्डच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क साधावा लागेल. जर कर्जाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल तर कर्जदाराला त्याच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे गहाण ठेवावी लागतील.

बँकेचे कर्ज घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक असतील

सर्वप्रथम, अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

पॅनकार्डही असायला हवे.

तुम्ही मागास जातीचा असाल तर अर्जदाराकडे जात प्रमाणपत्रही असायला हवे.

अर्जदाराच्या खात्याचा रद्द केलेला चेक असावा.

या सर्वांशिवाय एक प्रमाणपत्रही सादर करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही बँकेचे कर्ज थकीत नसल्याचे कळू शकेल.

बँकेच्या कर्जावर सबसिडी

डेअरी उद्योजक विकास योजनेंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील दुग्धशाळा चालकांना 25 टक्के अनुदान दिले जाणार आहे.  त्याचबरोबर महिला आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 33 टक्के अनुदान दिले जाईल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये तुम्हाला फक्त 10 टक्के पैसे गुंतवावे लागतील आणि उर्वरित 90 टक्के रक्कम बँक कर्ज आणि सरकारकडून सबसिडीद्वारे पुरवली जाईल.