Farmer Scheme: शेतकरी पुत्रांनो नोकरीची गरजच नाही..! मोदीच्या ‘या’ योजनेतुन 3 लाख कर्ज अन 60% अनुदान मिळवा, मत्स्यपालन करा; करोडो कमवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकापासून शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन (Fishery) करत आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायातून पशुपालक शेतकरी बांधवांना (livestock Farmer) चांगली कमाई देखील होत आहे.

यामुळे शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) असल्याचे सांगितले जाते. देशातील शेतकरी बांधवांनी मत्स्य पालन व्यवसाय (Fish Farming) मोठ्या स्तरावर सुरू करावा यासाठी शासन देखील शेतकरी बांधवांना कायमच प्रोत्साहित करीत असते. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच मत्स्य पालन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मत्स्यपालन व्यवसायाला बळकटी येईल म्हणून पंतप्रधान मत्स्य संपदा योजना नामक योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र सरकारची पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (Prime Minister’s Fisheries Wealth Scheme) ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात मत्स्यपालन व्यवसायाला चालना देण्याचे काम केले जात आहे. मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँक कर्ज, अनुदान आणि विमा इत्यादी सुविधा पुरविल्या जात आहेत.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकचं आहे आपल्या देशात सर्वात जास्त अल्पभूधारक शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पन्न मिळावे तसेच त्यांचे जीवनमान उंचावले जावे या हेतूने केंद्र सरकारकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अनेक योजनांच्या माध्यमातून मदत केली जात आहे.

अल्पभूधारक शेतकरी बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेंतर्गत मत्स्यपालन व्यवसायासाठी कर्ज तसेच मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी काही महत्त्वाची माहिती आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी घेऊन हजर झालो आहोत. 

योजनेचा उद्देश थोडक्यात जाणून घेऊ….

मित्रांनो सप्टेंबर 2014 मध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने म्हणजेचं मोदी सरकारने मत्स्यशेती क्षेत्रात गुंतलेल्या शेतकरी आणि मजुरांचे उत्पन्न वाढले पाहिजे आणि त्यांच्या रोजगारात वाढ होऊन असंघटित क्षेत्रातील शेतकरी, मजूर चांगले जीवन जगू शकले पाहिजे.

हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली. याला केंद्राने निळी क्रांती म्हणून संबोधले. अर्थातच केंद्र सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केल्याचे बघायला मिळतात.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या काही महत्वाच्या बाबी….

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, PMMSY (प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना) अंतर्गत मत्स्यपालन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना केंद्र सरकारकडून 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मत्स्यपालनाचे मोफत प्रशिक्षणही दिले जात ​​आहे.

PMMSY योजनेअंतर्गत, या क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि महिलांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. इतर सर्वांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. मत्स्यपालन व्यवसाय सुधारण्यासाठी आणि त्यासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने याला किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडले आहे.

या कार्डद्वारे शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात मत्स्यपालनासाठी कर्ज मिळू शकते. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत मत्स्यशेतकऱ्यांना कर्जासोबतच विम्याची सुविधाही दिली जात आहे. जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत मत्स्यपालन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही मत्स्य व्यवसायाच्या https://pmmsy.dof.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता.

पीएम मत्स्य संपदा योजनेअंतर्गत, मत्स्यपालक क्रेडिट कार्ड बनवून हमी शिवाय म्हणजेच बिना गॅरंटी 1. 60 लाखांचे कर्ज घेऊ शकतात. खरं पाहता या क्रेडिट कार्डवरून जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. मात्र या 1.60 लाखापेक्षा अधिक कर्ज घेण्यासाठी हमी किंवा गॅरंटी द्यावी लागते.

या योजनेत मत्स्य उत्पादक शेतकरी, मत्स्य कामगार आणि मासे विक्रेते, मत्स्य विकास महामंडळ, बचत गट/संयुक्त दायित्व गट, मत्स्यव्यवसाय क्षेत्र, मत्स्यपालन सहकारी संस्था, मत्स्य व्यवसाय संघ, उद्योजक आणि खाजगी कंपन्या आणि मत्स्य उत्पादक संस्था/कंपन्या फक्त पात्र असतील. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड,

मासेमारी कार्ड,

पत्त्याचा पुरावा,

मोबाईल नंबर,

अर्जदाराचे बँक खाते तपशील

अर्जदाराचे जात प्रमाणपत्र( अर्जदार अनुसूचित जातीमधील असल्यास) 

मत्स्यपालन कर्जासाठी येथे अर्ज करू शकताप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत सरकारकडून मत्स्यपालनासाठी 3 लाख रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी, तुम्हाला https://pmmsy.dof.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर सर्व आवश्यक कागदपत्रांसह PM मत्स्य संपदा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.