Farmer Scheme: पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेचा लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभे रहा, वाचा अर्ज करण्याची अंतिम तारीख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme:- शेती आणि शेतीशी संबंधित असलेले जोडधंदे यांच्या विकासाकरिता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजना चालवल्या जातात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतीसोबतच पशुपालन तसेच कुक्कुटपालन, मेंढी पालन यासारख्या जोडधंद्यांसाठी देखील राज्य शासनाच्या योजना असून अशा योजना या पशुपालक व सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी देखील फायद्याचे आहे.

या माध्यमातून जर आपण विचार केला तर पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दुधाळ गाई आणि शेळी गट वाटपाच्या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे. राज्यातील ग्रामीण भागातील जे काही सुशिक्षित व बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वतःचे रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून शाश्वत असा अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून सरकारकडून हा प्रयत्न करण्यात येत आहे.

 कसे आहे या योजनेचे स्वरूप?

या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेच्या माध्यमातून दुधाळ गाई, म्हशीचे वाटप करणे, शेळी मेंढी गटवाटप तसेच 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25 अधिक तीन तलंगावाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2023-24 या वर्षात राबवली जात आहे.

पशुपालकांना डेअरी तसेच पोल्ट्री किंवा शेळीपालन यामध्ये ज्या बाबींमध्ये अर्ज करायचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अर्जदाराने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर जर लाभ मिळाला नाही तर यामध्ये लाभार्थ्याला प्रत्येक वर्षी अर्ज करण्याची गरज नाही.

या योजनेतील प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळेल अशी शक्यता या माध्यमातून वाढली आहे. तसेच प्रतीक्षा यादीतील क्रमांका नुसार केव्हा लाभ मिळेल याचा अंदाज येत असल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा त्यासंबंधीचे प्लॅनिंग करणे शक्य होणार आहे.

 योजनेच्या माहितीसाठी कुठे संपर्क करावा?

या योजनेच्या माहितीकरिता जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, तालुका लघु पशुवैद्यकीय, सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा AH-MAHABMS या एप्लीकेशनच्या माध्यमातून देखील अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे?

या योजनेकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ही नऊ नोव्हेंबर 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत असणार आहे.

 या योजनेच्या अधिक माहितीसाठी चा टोल फ्री क्रमांक

या योजनेसाठीचा टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 18002330418 वर संपर्क साधून अधिकची माहिती घेता येईल.