शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ! पिकाच्या जोमदार वाढीसाठी बनवलं टॉनिक ; उत्पादनात झाली दुप्पट वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success News : महाराष्ट्रातील शेतकरी कायमच वेगवेगळ्या प्रयोगासाठी चर्चेत राहतात. आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी आता चांगली कमाई करत आहेत. पिकपद्धतीत बदल, पारंपारिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, फळबाग लागवडीचा प्रयोग, औषधी वनस्पतींचा प्रयोग, कृषी ड्रोन सारख्या यंत्रांचा वापर अशा वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे शेतकऱ्यांनी आता शेतीला एकदम हायटेक बनवले आहे.

वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने यापुढे जाऊन चक्क पीक वाढीसाठी टॉनिक बनवल आहे ज्यामुळे उत्पादनात दुपटीने वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे टॉनिक वेगवेगळ्या फळांपासून तयार करण्यात आले असून या टॉनिक चा वापर ज्या पिकासाठी केला जातो त्या पिकाच्या उत्पादनात वाढ होत असल्याचे सांगितलं जात आहे.

वासिम तालुक्यातील बिटोडा तेली येथील देविदास राऊत असे या शेतकऱ्याचे नाव आहे. देविदास राऊत हे कायमच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांनी याआधी रासायनिक खतांचा दुष्परिणाम पाहता सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करून दाखवली आहे. आता देविदास यांनी एक नवीन प्रयोग हातात घेतला आहे.

त्यांनी जवळपास दहा ते बारा प्रकारची फळ गोळा करून त्यापासून पीक वाढीसाठी टॉनिक बनवल आहे. दहा-बारा प्रकारची फळे गोळा केल्यानंतर त्याचा सडवा तयार केला जातो आणि त्या सडव्याला ड्रम मध्ये टाकून त्यामध्ये आवश्यक ती प्रक्रिया केली जाते आणि मग टॉनिक बनवलं जातं. या टॉनिक चा वापर झाडांना, भाजीपाला पिकांना केला जातो.

यामुळे पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्याची कमतरता दूर केली जाते. देविदास यांच्या मते फुलोरा अवस्थेत असलेल्या पिकांना या टॉनिकचा मोठा फायदा होतो. देविदास यांनी सर्वप्रथम हा प्रयोग आपल्या शेतात केला. याचा फायदा झाल्यानंतर इतर शेतकरी देखील या टॉनिक ची माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येत आहेत.

या टॉनिक साठी आवश्यक फळे वेगवेगळ्या हवामानानुसार आणि ऋतुमानानुसार गोळा करून ठेवली जातात. या कामी देविदास यांना त्यांचे बंधू सदाशिव आणि संदीप यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार ते या टॉनिकचा वापर 2014 पासून करत आहेत. विशेष म्हणजे हे टॉनिक ते स्वतःपुरता तयार करतात वापरतात परंतु जे शेतकरी त्यांच्याकडे येतात त्यांना देखील हे टॉनिक उपलब्ध करून दिले जात आहे.