Farmer Success Story: इंदापूर तालुक्यातील ‘या’ शेतकऱ्याने ब्राझील मधील फळ पिकवून कमवले लाखो रुपये! वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- कृषीक्षेत्र आता पहिल्यासारखे परंपरागत पिकांचे उत्पादन घेणारे क्षेत्र राहिले नसून सततचे येऊ घातलेले तंत्रज्ञान आणि विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या पिकपद्धती त्यामुळे कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे. बदलत्या हवामानाची परिस्थिती तसेच वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपदा इत्यादींमुळे आता शेतकऱ्यांचा शेती करण्याचा दृष्टिकोन बदलला असून त्यामुळे विविध पिकांची लागवड व खास करून फळबागांच्या लागवडीकडे शेतकरी प्रामुख्याने वळले आहेत.

मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळ पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न देखील मिळवलेले आहे. गेल्या काही वर्षापासून विचार केला तर ड्रॅगन फ्रुट सारख्या भारतामध्ये अल्प असलेल्या फळ पिकाचे उत्पादन देखील आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत आहेत.

एवढेच नाही तर जम्मू काश्मीर किंवा हिमाचल सारख्या थंड ठिकाणी उत्पादित होणाऱ्या सफरचंदाची लागवड देखील महाराष्ट्र सारख्या उष्ण ठिकाणी शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार केला तर या शेतकऱ्याने  ब्राझिलियन फळ असलेल्या पॅशन फ्रुटची लागवड करून खूप चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळवला आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 पॅशन फ्रुट लागवडीतून मिळवला भरघोस नफा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या कचरवाडी या गावचे रहिवासी असलेले शेतकरी पांडुरंग बराळ यांनी परंपरागत शेती पद्धत व पिकांना फाटा देत चक्क ब्राझिलियन फ्रुट असलेल्या पॅशन फ्रुटची लागवड केली व त्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पैसा मिळवला आहे.

पांडुरंग बराळ हे अगोदर त्यांच्या शेतामध्ये प्रामुख्याने डाळिंब तसेच इतर भाजीपाला पिके, पपई व पेरू सारख्या फळबागांची शेती करायची. परंतु कष्ट आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये हवा तेवढा आर्थिक नफा त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी युट्युबचा वापर केला व या माध्यमातून अनेक शेतीचे नवनवीन तंत्र शिकता येतील अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. हे करत असतानाच त्यांना राजस्थान राज्यातील किशनगड येथील एका शेतकऱ्याने पॅशन फ्रुटची यशस्वी लागवड केल्याची माहिती मिळाली व याची माहिती घेण्यासाठी त्यांनी थेट किशनगड गाठले.

त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती घेतली व पांडुरंग बराळ यांनी पॅशन फ्रुट लागवड करण्याचा निर्णय घेतला. खते व औषधांची गरज कमी व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी बियाण्यांच्या साह्याने पॅशन फ्रुटची रोपे घरीच तयार केली व एका एकर क्षेत्रामध्ये सात बाय दहा या अंतरावर पॅशन फ्रुटची लागवड केली. लागवडीनंतर साधारणपणे चार महिन्यांनी झाडावर हिरवीगार फळे येऊ लागली व या फळांचे काढणी सुरू आहे. त्यांनी पिकवलेली पॅशन फ्रुट सध्या पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेमध्ये विकले जात आहे.

 मिळाला चार लाख रुपयांचा नफा

सध्या ते त्यांनी पिकवलेले पॅशन फ्रुट हे पुणे आणि मुंबई या ठिकाणी विकत असून त्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत या फळाला 130 ते दीडशे रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. आतापर्यंत पांडुरंग बराळ यांनी एका एकरमध्ये चार लाख रुपयांचा नफा मिळवलेला आहे.

जर आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून या फळाचा विचार केला तर वजनाने हलके असलेल्या या फळाचा रस डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या गंभीर आजारांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. महत्वाचे म्हणजे मोठ्या मोठे मॉल्स आणि ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर पॅशन फ्रुट 250 रुपये प्रति किलो दराने देखील विकले जात आहे.