धक्कादायक ! सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रात जुलैनंतर 1 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या ; देश कृषिप्रधान की आत्महत्या प्रधान

Farmer Suicide : भारतासारख्या कृषिप्रधान देशात बळीराजा आत्महत्या करतो, ही निश्चितच चिंताजनक आणि शर्मेची बाब आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातुन शेतकरी आत्महत्या संदर्भात एक खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे.

खरं पाहता नवोदित एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर आपल राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार केला. मात्र एक जुलै ते 15 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात तब्बल 1000 शेतकरी बांधवांनी आपले आयुष्य संपवले असल्याची धक्कादायक माहिती मदत व पुनर्वसन विभाग यांच्याकडे झालेल्या नोंदीच्या माध्यमातून समजली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता यावर्षी जुलै महिन्यापासून शेतकऱ्यांवर संकटांचे मालिका कायम आहे. यावर्षी मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस लांबला त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेली पिके भुईसपाट झाली.

यातून बचावलेली पीक शेतकरी बांधव तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासत होते, मात्र ती पिके देखील परतीच्या पावसाने नासवली अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हाती कवडीमोल उत्पन्न राहिले. शेतकऱ्यांनी व्याजाचे पैसे घेऊन खरीप हंगामाची पेरणी केली होती, आता उत्पन्नच मिळाले नाही म्हटल्यानंतर व्याजाचे पैसे परतफेड कसे करायचे हा देखील प्रश्न शेतकऱ्यांपुढे कायम आहे.

अतिवृष्टीची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली असली तरी देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई राहिलेली आहे. जवळपास बाराशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना वर्ग करणे बाकी आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखानदारांकडे 435 कोटी रुपयांची एफ आर पी बाकी आहे. निश्चितच बळीराजाच्या आत्महत्या मागे कुठे ना कुठे शासनाची तसेच प्रशासनाची उदासीन धोरणे देखील कारणीभूत ठरत आहे.

रम्यान आता महावितरणने रब्बी हंगामाच्या तोंडावर आणि खरीप हंगामातील मुख्य पीक कापूस आणि तूर वावरातच उभी असताना वीज तोडणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रब्बी हंगामातील पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. अशा परिस्थितीत थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांची वीज तोडणी सुरू केली आहे.

यावर आवाज उठवला असता शेतकऱ्यांनी निदान चालू वीजबिल भरल्यास वीज तोडणी केली जाणार नाही असे महावितरणने सांगितले आहे. यामुळे तूर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र इतर एक ना अनेक प्रश्न तसेच कायम आहेत.

राज्यात सर्वात जास्त मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या काळात कोकण विभागात ०००, अमरावती विभागात ९३०, औरंगाबाद विभागात ८४६,  नाशिक विभागात ३१७, नागपूर विभागात २८९, पुणे विभागात १८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.