पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नादखुळा ! बटाट्याच्या पिकातून मिळवलं भरघोस उत्पादन ; असं केलं व्यवस्थापन

Success Story : यावर्षी पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा मात्र याची झळ अधिक पाहायला मिळाली.

सुरुवातीला मान्सूनच आगमन उशिरा झाल. त्यानंतर, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला अतिवृष्टी झाली काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली शेतात सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेवटी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस आला आणि अतिवृष्टी मधून वाचवलेलं थोडाफर पिक देखील जलसमाधि घेताना दिसलं. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. पुणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती. जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी मात्र कायमच वेगवेगळ्या प्रयोगासाठी राज्यात चर्चेचा विषय ठरतात.

असाच एक प्रयोग जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मौजे शिंगवे येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने राबवला असून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील बटाटा पिकातून चांगले उत्पादन मिळवून दाखवले आहे. बाळासाहेब बबन गाढवे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव. या शेतकऱ्याने 50 किलो बटाट्याच्या बेण्यापासून तब्बल 16 पिशवी बटाटा उत्पादन घेऊन दाखवल आहे.

बाळासाहेब दरवर्षी कांदा आणि बटाटा या दोनच पिकाची शेती करत असतात. यावर्षी देखील या दोन्ही पिकांची त्यांनी लागवड केली असून बटाटा पिकातून चांगले भरघोस उत्पादन मिळवून दाखवले आहे. खरं पाहता बटाटा लागवड केली त्यावेळी अतिवृष्टी झाली. यामुळे परिसरातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. बटाट्याच्या पिकात सर्वत्र पाणी साचले परिणामी शेतकऱ्यांचे पीक वाया गेले. मात्र बाळासाहेबांनी आपल्या शेतात पाणीच साचू दिले नाही.

पाणी साचू नये यासाठी शेतात योग्य त्या उपाययोजना केल्या. तसेच ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. ठिबकच्या माध्यमातूनच त्यांनी खतांचे व्यवस्थापन केले. त्यामुळे खतांवर होणारा अपव्यय खर्च टाळता आला. शिवाय पिकांना पोषण देखील चांगले मिळाले. त्यामुळे त्यांना अधिक उत्पादन मिळाले आहे. परिसरातील इतर शेतकऱ्यांचा विचार केला असता त्यांना 50 किलो बेण्यामागे अवघ्या आठ ते नऊ पिशवी बटाटा उत्पादन झाल आहे.

मात्र योग्य नियोजन करून बाळासाहेब यांनी 50 किलो बेण्यामागे तब्बल 16 पिशवी बटाटा उत्पादन घेऊन दाखवले आहे. त्यामुळे निश्चितच बाळासाहेबांची चर्चा रंगली आहे. मात्र असे असले तरी बटाट्याला सध्या अपेक्षित असा दर मिळत नसल्याने बाळासाहेबांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुरुवातीला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव बटाट्याला मिळत होता मात्र तूर्तास 1800 ते 1900 रुपये प्रति क्विंटल असा दर बटाट्याला मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे बाळासाहेबांचे म्हणणे आहे. विक्रमी उत्पादन घेऊन देखील हातात कवडीमोल उत्पन्न मिळणार असल्याचे बाळासाहेबांनी नमूद केले आहे.