Farming Buisness Story: ही शेती करून शेतकरी झाले लखपती! वाचा शेतीचे वैशिष्ट्य आणि महत्त्व

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Farming Buisness Story: शेतीमध्ये आता बरेच शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत असून यामध्ये यशस्वी होताना दिसून येत आहे. शेती हा व्यवसाय आता उदरनिर्वाह पुरता राहिला नसून खूप मोठे व्यावसायिक  दृष्टिकोन समोर ठेवून आता शेती केली जाते. तसेच शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातल्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करू लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिक उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली.

तसेच पिकांच्या वैविध्यपूर्ण लागवडीमुळे देखिल शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसून येत आहे. हा जो बदल शेतीमध्ये पाहायला मिळतो तो एक किंवा दोन शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून आता संपूर्ण गावेच आता शेतीमधील हा बदल स्वीकारू लागले आहेत. अगदी त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर देवगाव येथील अनेक शेतकरी आता परंपरागत पिकांचा नाद सोडून रेशीम शेतीकडे वळले आहेत. रेशीम शेतीने या गावातील अनेक शेतकऱ्यांना लखपती बनवले आहे. याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 देवगावमधील शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून झाले लखपती

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, नैसर्गिक आपत्ती तसेच बदलत्या हवामानाचा शेतीवर खूप विपरीत परिणाम झाल्यामुळे पिकपद्धतीत बदल करणे खूप गरजेचे आहे व हेच ओळखून  देवगाव येथील शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी रेशीम शेतीची कास धरली. रेशीम शेतीची कास धरल्यानंतर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न तर मिळवलेच परंतु या माध्यमातून अनेक शेतकरी लखपती देखील झालेत.

उदाहरणच घ्यायचे झाले तर या गावचे महादेव ढाकणे यांनी इतिहास या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असून त्यांचे सध्याचे वय हे 45 वर्षे इतके आहे. त्यांनी त्यांच्या तीन एकर शेतामध्ये रेशमाची लागवड केली व या माध्यमातून एका वर्षाला साधारणपणे 12 लाखांचे उत्पादन मिळवले. नुकतीच त्यांनी 288 अंडे पुंजाची एक बॅच जालना बाजारात विकली. जवळपास दीड एकरातील या उत्पन्नातून एक लाख 99 हजार 520 रुपये  आर्थिक उत्पन्न त्यांना मिळाले.

तसेच या गावचे दुसरे शेतकरी सोमनाथ गीते यांचे उदाहरण पाहिले तर त्यांच्याकडे 18 एकर जमीन असून त्यापैकी तीन एकर वरच त्यांनी रेशीम शेती केली आहे. यांना देखील रेशीम शेतीतून भरघोस उत्पादन मिळत असून तीन एकरामध्ये एका वर्षात आठ ते नऊ लाख रुपये नफा त्यांना झाला आहे.एका क्विंटल मागे त्यांना 43 हजार रुपयांचा नफा मिळाला आहे.

तीन एकर रेशीम लागवड केल्यानंतर उरलेल्या शेतामध्ये गीते यांनी कापूस तसेच तूर, मका व मोसंबी यासारख्या फळ पिकांचे उत्पादन घेतले असून या पिकांमधून त्यांना 15 ते 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव येथील शेतकऱ्यांनी रेशीम लागवडीचा प्रयोग यशस्वी केला असून याकरिता त्यांनी कठोर परिश्रम आणि प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापरावर जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे सध्या मराठवाडा हे रेशीम लागवडीचे प्रमुख केंद्र बनण्याची दाट शक्यता आहे.