Floriculture Farming: तरुणाने इंजिनीयरच्या नोकरीला ठोकला रामराम व सुरू केली फुलशेती! वर्षाला कमवत आहे लाखो रुपयांचा नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Floriculture Farming:- आजकालचे तरुण मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळू लागले असून नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्याने बरेच तरुण आता विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आपल्याला दिसून येते. यामध्ये बरेच उच्चशिक्षित तरुण आता शेतीमध्ये येऊ लागले असून उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करण्याकडे या तरुणांचा कल असल्याचे आपल्याला दिसून येते.

विविध प्रकारचे भाजीपाला तसेच फुल पिके व फळबागांची लागवड व त्याला तंत्रज्ञानाची जोड अशा दुहेरी संगमातून देखील लाखोंचे उत्पन्न मिळवता येते हे तरुण सिद्ध करून दाखवत आहेत. अगदी याच मुद्द्याला साजेशी अशी एक यशोगाथा पाहिली तर यामध्ये एका तरुणाने इंजिनियरची नोकरी सोडली व फुले शेती करायला सुरुवात केली. या फुलशेतीच्या माध्यमातून तो आज लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे व याच तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 इंजिनिअरची नोकरी सोडून सुरू केली फुलशेती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जमशेदपूर येथील पाटमाडा या गावचा रहिवासी असलेल्या सुशांत दत्ता यांनी इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण पूर्ण केले व इंजिनिअर झाल्यानंतर त्याला अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून नोकरीच्या चांगल्या ऑफर आल्या. परंतु सुशांतने त्या सपशेल नाकारल्या व घरची जी काही शेती आहे ती नवीन तंत्रज्ञानाने करावी अशा पद्धतीचा त्याने निर्णय घेतला.

परंतु यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी याचा विचार करत असताना त्याला फुलशेतीची कल्पना सुचली व सुशांतने जरबेरा फुलांची लागवड करण्याची निश्चित केली. आज तो पाच रंगांच्या जरबेरा फुलाची लागवड करत असून त्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत आहे.

जर आपण फुलाचा विचार केला तर आज बाजारामध्ये जे काही फुले विकली जातात त्यामध्ये हे सर्वात महाग असे फुल असते. या गावचे बरेच तरुण शेतकरी फुललागवड करत असून याकरिता त्यांनी अगोदर त्याच्या गाव परिसरातील शेतीतील मातीची चाचणी करून घेतली व त्या अनुषंगाने बँकेकडून कर्ज घेऊन पॉलिहाऊस उभारले.

त्यानंतर जरबेरा फुलांची लागवडी विषयी माहिती गुगलची मदत घेऊन संपूर्णपणे घेतली व या पॉलिहाऊस मध्ये जरबेरा फुलांची लागवड करायला सुरुवात केली व अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांना लाख रुपयांचे उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. सध्या जरबेराची लागवड केली असून 2700 रोपांची लागवड सुशांत यांनी केली आहे.

या जरबेराच्या रोपांना आठवड्यातून दोनदा फुले येतात व ही फुले बाजारात विक्री करून त्या माध्यमातून चांगला नफा सुशांत मिळवत आहे. याबद्दल माहिती देताना पाटमाडा येथील फुल उत्पादक शेतकरी राजेश रंजन यांनी सांगितले की, या गावची बरीच मुलं उच्चशिक्षित आहेत व बऱ्याच जणांनी इंजिनिअरिंग केलेले आहे.

परंतु इंजिनिअरची नोकरी न करता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला असून जरबेरा फुल लागवडीतून येणाऱ्या वर्षभरात ही मुलं तीन ते चार लाख रुपयांचा नफा कमावतील. अगोदर जरबेरा फुलांची या परिसरामध्ये आवश्यकता असेल तर ती बंगाल आणि बेंगलोर मधून येत होती परंतु आज पाटमाडा या छोट्या गावामध्ये जरबेरा फुलांची लागवड केल्यामुळे या फुलांची मागणी स्थानिक पातळीवरच पूर्ण होऊ लागली आहे.

अशा पद्धतीने सुशांत याच्या उदाहरणावरून दिसून येते की शेतीला जर आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन पिकांची जोड दिली तर आपण शेतीच्या माध्यमातून देखील लाखो रुपयांची कमाई करू शकतो.