या पिकाची शेती तुम्हाला बनवणार 5 ते 6 महिन्यात लखपती! वाचा या पिकाच्या लागवडीपासून इतर ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेती म्हटले म्हणजे शेतकरी बंधू वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. इतर क्षेत्रातील उत्पादनांप्रमाणेच शेतीतून निर्माण होणारे उत्पादनांची मागणी ही त्याच्या वापरानुसार ठरत असते. तसे पाहायला गेले तर शेती व्यवसायातील सर्वच प्रकारचे उत्पादने ही मानवाच्या जीवनाशी आणि दैनंदिन गरजांशी निगडित आहेत. परंतु तरीदेखील अशी काही पिकांची उत्पादने आहेत की ती काही दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ठरतात.

आता वेगवेगळ्या प्रकारची पिकांची लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. औषधी वनस्पती असो किंवा मसाल्याचे पदार्थ यांचे देखील लागवड आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर हा लागवडीपासून कापणी पर्यंत होऊ लागल्यामुळे आता कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगले उत्पादन मिळणे शक्य झाले आहे. याच अनुषंगाने जर आपण लसुन या पिकाचा विचार केला तर ते त्याच्याशी समकक्ष म्हणता येईल अशा कांदा पिकाच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात लागवड केले जाणारे पीक आहे.

बहुतांश शेतकरी वर्षभर आपल्या घराला पुरेल एवढ्या लसणाची लागवड फक्त करतात. परंतु जर या पिकाची लागवड व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्याचे ठरवले व क्षेत्रात जर वाढ केली तर नक्कीच या पिकांमध्ये  अवघ्या पाच ते सहा महिन्यांमध्ये तुम्हाला लखपती बनवण्याची क्षमता आहे. साहजिकच त्यासाठी बाजारभाव उत्तम मिळणे गरजेचे आहे. परंतु तरीदेखील जर लसणाची लागवड केली तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. त्याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये लसूण शेती विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

 लसूण पिकाचे महत्त्व

लसूण हा आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला पदार्थ असून मसाल्याचा पदार्थ तसेच औषधी म्हणून देखील याचा वापर मोठ्या प्रमाणावर भारतातच नव्हे तर जगात केला जातो.हे एक नगदी पीक असून अगदी सर्वसामान्य व्यक्तींच्या स्वयंपाक घरात देखील हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बाजारपेठेत त्याला कायम मागणी असते व याच दृष्टिकोनातून लसूण लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

 लसणाची लागवड कशी केली जाते?

कुठल्याही पिकाची लागवड करताना त्याचा नेमका कालावधीत लागवड होणे खूप गरजेचे असते. त्याच पद्धतीने लसणाची लागवड करायची असेल तर ती साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात करणे योग्य ठरते. लसणाची लागवड करताना त्याच्या पाकळ्यांपासून केली जाते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. साधारणपणे आपल्याकडे दहा सेंटिमीटर अंतरावर लागवड करणे फायद्याची ठरते.

कारण अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर लसणाचा गड्डा चांगल्या प्रकारे बांधण्यास मदत होते. आपल्याकडे गादीवाफ्यावर लसणाची लागवड प्रामुख्याने बरेच शेतकरी करतात परंतु सरी सोडून जर कड्याने लागवड केली  तरी फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे लसणाची लागवड करताना ज्या जमिनीमध्ये पाणी साचणार नाही व चांगली पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल अशा जमिनीतच लसणाची लागवड फायदेशीर ठरते.

लसुन पिकासाठी बेण्याची निवड करताना

लसूण लागवडीकरिता बेण्याची निवड करताना गड्डा एकावर एक अशा गोलाकार पाकळ्यांनी बनलेला असतो. गड्ड्यातील पाकळ्या सुटसुटीत व्हाव्यात याकरिता ते पायाखाली तुडवून मग त्याला उफऊन स्वच्छ केले जातात व लागवडीकरिता मोठ्या व निरोगी परिपक्व पाकळ्यांचा उपयोग करतात.

 भरघोस उत्पादनाकरिता खत व्यवस्थापन

लसुन पिकाकरिता खत व्यवस्थापन करण्यासाठी एका एकरला 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश साधारणपणे लागते. यामध्ये खतांचे नियोजन करताना लसणाची लागवड करण्यापूर्वी 50 टक्के नत्राची मात्रा द्यावी व संपूर्ण स्फुरद व पालाश देऊन टाकावे.

नंतर राहिलेली नत्राची मात्रा दोन टप्प्यात विभागून देणे गरजेचे आहे. यामध्ये लागवड केल्यानंतर तीस दिवसांनी 25% मात्रा व दुसरी 25% मात्रा ही लागवडीच्या 45 ते 50 दिवसांनी द्यावी. लसुन पिकाला गंधकाची मात्रा मिळावी याकरिता तुम्ही अमोनियम सल्फेट किंवा सुपर फोस्फेटचा वापर करू शकतात.

 लसूण पिकाकरिता पाणी व्यवस्थापन

लसूण पिकाकरिता पाण्याचे व्यवस्थापन करताना ते काळजीपूर्वक करावे. लसणाची लागवड केल्यानंतर त्याची उगवण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने जमिनीची मगदूर आणि पिकाची गरज ओळखून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

 लसुन पिकाची काढणी करताना कशी करावी?

साधारणपणे हे पीक 120 ते 130 दिवसांमध्ये काढणी करता तयार होतो. जेव्हा जमिनीमध्ये लसणाचा गड्डा परिपक्व होतो तेव्हा त्याच्या पानांची वाढ थांबते व ती पिवळी पडायला लागतात. एवढेच नाही तर शेंडे देखील सुटतात. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर लसणाची पाने पूर्ण सुखण्याआधीच काढणी करणे गरजेचे आहे.

कारण काढणी सोपे जाते आणि लसणाच्या जुळ्या बांधने देखील सोपे जाते. खुरप्याची मदत घेऊन लसणाची काढणी गरजेचे आहे. लसून काढणीनंतर साधारणपणे दोन दिवसांपर्यंत शेतामध्ये तसाच ठेवावा व शेतामध्ये लसूण ठेवताना त्याचा गडाचा भाग त्याच्या पानांनी झाकला जाईल अशा पद्धतीने ठेवावा.

 लसणाचे काही महत्त्वपूर्ण वाण

लसणाची लागवड करायची असेल तर त्याकरिता ॲग्री फाउंड व्हाईट(जी-41), श्वेता( सिलेक्शन 10 ) आणि गोदावरी( सिलेक्शन दोन ) या वाणांची निवड करणे गरजेचे आहे.

तसेच संभाव्य कीड व रोग व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. अशा पद्धतीने जर लसणाचे व्यवस्थापन केले तर एका हेक्टर मध्ये सहा ते दहा टणांपर्यंत उत्पादन मिळणे शक्य आहे.