Goat Farming : पशुपालकांनो, शेळ्यांच्या ‘या’ जाती आहेत खास ; यांचे संगोपन बनवणार तुम्हाला मालामाल, डिटेल्स वाचा

Goat Farming : आपल्या देशात शेती सोबतच पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनात शेळीचे संगोपन सर्वाधिक केले जाते. अल्पभूधारक शेतकरी बांधव शेळीपालन मोठ्या प्रमाणात करतात. खरं पाहता, शेळीपालन करण्यासाठी कमी जागा आणि कमी भांडवलं लागते.

यामुळे अलीकडे शेतकरी बांधव शेळींचे मोठ्या प्रमाणात संगोपन करत आहेत. शेळीचे संगोपन हे मांस आणि दुग्धउत्पादनासाठी केले जाते. निश्चितच यातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे. मात्र असे असले तरी जाणकार लोक शेळीच्या सुधारित जातींचे संगोपन करण्याचा सल्ला देत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत आज आपण शेळीच्या तीन प्रगत जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या शेळीच्या तीन जातींची माहिती जाणून घेणार आहोत त्या जातीची राजस्थानातील उदयपूरच्या महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी ओळख पटवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेष म्हणजे या तीन जातींची नोंदणी नॅशनल ब्युरो ऑफ ऍनिमल जेनेटिक रिसोर्सेस करनाल या ठिकाणी देखील करण्यात आली आहे. या तिन्ही जातींची एक विशेषता ती म्हणजे या जाती दुग्धोत्पादनासाठी आणि मांस उत्पादन अशा दुहेरी हेतूने पाळल्या जातात. यामुळे निश्चितच पशुपालकांना याचा फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

गूजरी शेळीची जात :- शेळीची ही एक प्रगत जात असून राजस्थानातील अजमेर, टोंक, जयपूर, सीकर आणि नागौर जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात या शेळीचे संगोपन केले जाते. गूजरी शेळी ही आकाराने मोठी असते. साहजिकच यामुळे या शेळीचे वजन इतर शेळ्यांपेक्षा अधिक असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जातीच्या शेळ्यांचे दूध उच्च प्रतीचे असते. यामुळे या जातीच्या शेळीच्या दुधाला मोठी मागणी असते शिवाय दूध उत्पादनही जास्त आहे. तसेच या जातीच्या शेळ्या आकाराने मोठ्या असल्याने यापासून मांसही जास्त मिळते. साहजिकच या जातीची शेळी ही मांस आणि दुग्ध उत्पादनासाठी फायदेशीर आहे.

सोजत शेळीची जात :- ही देखील शाळेची एक प्रगत जात आहे. या जातीचे संगोपन देखील राजस्थानात मोठ्या प्रमाणात केले जाते. सोजत शेळी ही नागौर, जैसलमेर, पाली आणि जोधपूर या जिल्ह्यांत पाळली जात असून या जिल्ह्यांची ओळख या शेळीच्या माध्यमातून होत आहे. या शेळ्या विशेषता मांस उत्पादनासाठी पाळल्या जातात कारण की या शेळी पासून दूध खूपच कमी प्रमाणात मिळते. यामुळे पशुपालक मांस उत्पादनासाठी या शेळीची निवड करतात.

करौली शेळीची जात :- वर नमूद केलेल्या दोन जातींप्रमाणेच ही देखील एक शेळीची प्रगत जात असून राजस्थान मध्येच ही शेळी मोठ्या प्रमाणात पाळली जाते. ही जात राजस्थानच्या करौली जिल्ह्यात आढळत असल्याने या जातीला करोली असे नाव पडले आहे. करौली जातीच्या शेळ्या या दूध आणि मांस अशा दुहेरी हेतूने पाळल्या जातात. असं सांगितलं जातं की शेळीची ही प्रगत जात राजस्थानातील मीना समाजात अधिक लोकप्रिय असून समाजाच्या लोक या शेळीचे सर्वाधिक संगोपन करत असतात.