Goat Rearing: कमी चाऱ्यात अधिक नफा मिळवायचा असेल तर पाळा शेळीची ‘ही’ प्रजात! कमी कालावधीत कमवाल लाखोत नफा

Ajay Patil
Published:
nigerian dwarf goat

Goat Rearing:- शेळीपालन हा व्यवसाय कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत करता येत असल्यामुळे अगदी कित्येक वर्षापासून शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करताना आपल्याला दिसून येतात. परंतु आता शेळी पालन व्यवसायामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाने शिरकाव केला असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता मोठ्या स्वरूपामध्ये केला जात आहे.

त्यातल्या त्यात आता नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने अनेक उच्चशिक्षित तरुण देखील या व्यवसायाकडे वळले असून तंत्रज्ञानाचा वापर करून या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवत आहेत. शेळीपालन व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे व त्यासोबतच शेळीच्या जातिवंत जातींचे संगोपन हे खूप महत्त्वाचे असते.

शेळीपालनामध्ये पाहिले तर शेळ्यांच्या अनेक प्रजाती असून त्यांचे वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. या लेखामध्ये आपण अशाच एका शेळीच्या जातीची माहिती घेणार आहोत जी कमी खर्चात व कमी चाऱ्यामध्ये जास्तीच्या नफा देऊ शकते.

 नायजेरियन डॉर्फ शेळी देईल अधिक नफा

नायजेरियन डॉर्फ प्रजातीच्या शेळ्या या शेळीपालनामध्ये खूप महत्त्वाच्या असून अगदी कमीत कमी चाऱ्यामध्ये जास्त नफा देण्याची क्षमता या प्रजातीत आहे. या जातीच्या शेळ्या आकाराने अगदी लहान असतात. परंतु नफा देण्याच्या दृष्टिकोनातून त्या इतर प्रजातींच्या शेळ्यांपेक्षा सरस आहेत.

जर तुम्ही या शेळ्यांच्या पालनासाठी उत्तम असे शेड उभारले तर खूप चांगला फायदा होतो. शेडमध्ये पुरेशी व्हेंटिलेशन प्रणाली असणे खूप गरजेचे आहे आणि पुरेशा प्रमाणात पोषक आहार देणे गरजेचे आहे. तसेच हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन व पाण्याचे व्यवस्थापन देखील महत्वाची भूमिका पार पाडते.

जर आपण या प्रजातीच्या शेळ्यांचा प्रजनन दर पाहिला तर तो इतर प्रजातीपेक्षा जास्त आहे. या शेळ्या सरासरी दोन ते चार पिल्लांना जन्म देतात व सहा ते सात महिन्यांमध्ये परिपक्व होऊन दूध द्यायला लागतात. या जातीच्या शेळ्या खूप मजबूत आणि कणखर असतात. त्यामुळे जास्तीची काळजी घेण्याची गरज नसते.

 दूध उत्पादनासाठी आहे महत्त्वाची प्रजात

दूध आणि मांस उत्पादनासाठी नायजेरियन डॉर्फ हे शेळी खूप उत्तम मानली जाते. दिवसभरात इतर प्रजातीच्या शेळ्यांना जितका चारा लागतो त्यापेक्षा खूप कमी चारा या शेळ्यांना लागतो. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर कमी खर्च, कमी कष्ट आणि कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही चांगला नफा या शेळ्यांच्या पालनातून मिळवू शकतात.

या शेळ्यांचा आकार लहान असतो मात्र दूध देण्याची क्षमता जास्त असते. या प्रजातीच्या शेळ्यांच्या मांसाला बाजारात देखील चांगली मागणी असल्याने दर देखील चांगला मिळतो. त्यामुळे नायजेरियन डॉर्फ शेळीचे पालन हे फायद्याचे ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe