Goat Rearing Tips: शेळीपालनातून लाखो रुपये मिळवायचे असतील तर ‘या’ 20 गोष्टींची घ्या काळजी! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goat Rearing Tips:- सध्या अनेक सुशिक्षित तरुण हे शेळी पालन व्यवसायाकडे वळताना दिसून येत असून हा व्यवसाय तसा खूप परवडणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. शेळीपालनाकरिता तुम्हाला कमीत कमी जागा व कमीत कमी खर्च लागतो. परंतु त्यामानाने त्यातून मिळणारा नफा हा प्रचंड प्रमाणात असतो.

त्यामुळे आता शेळी पालन व्यवसाय  करताना त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अनेक अर्थाने हा व्यवसाय फायद्याचा ठरताना दिसून येत असून अनेक उच्चशिक्षित करून देखील या व्यवसायामध्ये उतरले आहेत. जर आपण  शेळीपालन व्यवसायाचा विचार केला तर यामध्ये यशस्वी होण्याकरिता काही महत्त्वाच्या बाबी किंवा गोष्टी पाळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण काही महत्त्वाच्या अशा 20 गोष्टी पाहणार आहोत ज्यांची विशेष काळजी घेतली तर शेळी पालन व्यवसाय तुम्हाला लाखात नफा देऊ शकतो.

 शेळीपालन व्यवसाय करा परंतु या गोष्टींची काळजी घ्या

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळीपालनासाठी तुमच्या राज्यानुसार शेळ्यांच्या दर्जेदार जातींची निवड करा.

2- एका शेळीला शेडमध्ये दहा ते बारा चौरस फूट जागा मिळेल अशा पद्धतीने सोय करा.

3- एका शेडमध्ये 20 पेक्षा जास्त शेळ्या ठेवू नका.

4- मोठ्या शेळ्यांना आणि त्यांच्या पिल्लांना काँक्रीटच्या मजला किंवा कोब्यावर ठेवू नका.

5- तसेच मेंढ्या आणि शेळ्यांना शेडमध्ये एकत्र ठेवू नये.

6- दोन महिन्यापेक्षा जास्त वयाची पिल्ले असतील तर एन्टेरोटॉक्सिमिया नियंत्रणाकरिता दोन लसीकरण करावेत.

7- शेळीच्या गर्भधारणाच्या शेवटच्या दीड महिन्यात चारा व्यतिरिक्त 100 ग्राम धान्याचे मिश्रण द्यावे.

8- शेळ्यांच्या व्यायलाच्या वेळी त्यांना स्वच्छ ठिकाणी ठेवावे.

9- शेळ्यांच्या पिल्लांच्या जन्माच्या वेळी साबनाणे हात स्वच्छ धुवावेत आणि त्यानंतरच शेळींना आणि पिलांना स्पर्श करावा.

10- त्यानंतरच पिल्लांची नाळ नवीन ब्लेडने तीन इंच मागे कापावी.

11- नाळ कापल्यानंतर त्यावर टिचर आयोडीन किंवा बोकाडीन, आयरॉल लावावे.

12- पिल्लांचा जन्म झाल्यानंतर वीस मिनिटांच्या आतमध्ये पिलांना शेळीचे दूध पाजावे.

13- दिवसभर पिल्लांना शेळी सोबतच ठेवावे.

14- शेळीच्या पिल्लांचे थंडीपासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना करावेत.

15- पिल्लांचे न्यूमोनिया पासून संरक्षण व्हावे याकरता टेट्रासायक्लिन हे औषध पाण्यात मिसळून द्यावे.

16- जेव्हा शेळीचे वजन 15 किलो असते तेव्हा त्यांचे मांस खाण्यायोग्य बनते.

17- शेळ्यांची विक्री नियोजन करताना ते नऊ ते दहा महिन्याच्या वयात झाल्यावरच त्या विकल्या जाऊ शकतात.

18- शेळ्यांच्या बांधण्याची जागा स्वच्छ आणि हवेशीर ठेवावी.

19- ज्या ठिकाणी शेळ्या बांधलेल्या असतात त्या ठिकाणाची जागा सकाळ संध्याकाळ स्वच्छ करावी.

20- शेडच्या अवतीभवती पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी करावी.