शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेळीपालन व्यवसायासाठी मिळणार 50 लाखांचं अनुदान ; ‘या’ वेबसाईटवर करावा लागेल अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Scheme : देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. शेतीशी निगडित पशुपालन व्यवसायासाठी देखील शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.

खरं पाहता पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि या व्यवसायातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. म्हणून जाणकार लोक शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.

शासनाकडून देखील या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. शासनाच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत कुकुट पालन, शेळी/मेंढी पालन, वराह पालन, मुरघास निर्मिती यासाठी लाखो रुपयांचा अनुदान दिल जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो आणि यासाठी अर्ज कुठे करावा लागतो याविषयी जाणून घेणार आहोत.

किती मिळणार अनुदान?

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत कुक्कुटपालन व्यवसायासाठी २५ लाख रुपये, शेळी किंवा मेंढीपालन करण्यासाठी ५० लाख, वराह पालनसाठी ३० लाख, मूरघास निर्मितीसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचे प्रावधान करण्यात आले आहे.

कोणाला मिळणार अनुदान / योजनेच्या पात्रता

व्यक्तिगत व्यावसायिक, स्वयंसहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, कलम आठ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, सह जोखीम गट, सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी वैयक्तिक लोकांना तसेच संस्थांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

कुठं करावा लागेल अर्ज 

शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या अनुषंगाने शासनाकडून ही योजना राबवली जात आहे. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाच्या विशेष अर्थसहाय्याने वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्या आहेत. केंद्र शासनाने सन 2022 – 2023 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी दिलेली आहे.

वर नमूद केलेल्या पशुपालन व्यवसायासाठी तसेच मुरघास निर्मितीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे. या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे हेतू शेतकरी बांधवांना पशुपालन व डेअरी विभागाच्या https://nlm.udyamimitra.in/Login या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या तालुका पशुसंवर्धन विभागास भेट द्यावी.