Guava Cultivation:- महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या फळबागांची लागवड केली जाते व यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या पेरूची लागवड केली जात असून महाराष्ट्रामध्ये हळूहळू पेरू खालील लागवड क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे. पेरूला आता बाजारपेठेत दिवसेंदिवस मागणी वाढत असल्यामुळे आणि इतर फळ पिकांच्या तुलनेमध्ये नक्कीच एक परवडणारे पीक असल्याने पेरू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येतो.
महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतामध्ये देखील आता अनेक राज्यात अनेक फळ पिकांचे प्रयोग शेतकरी करताना दिसून येतात. प्रामुख्याने फळबागांच्या लागवडीकडे तरुण शेतकऱ्यांचा ओढा जास्त आहे. याच अनुषंगाने जर आपण हरियाणातील जिंद येथील प्रगतिशील तरुण शेतकरी सुनील कंडेला याचा विचार केला
तर यांनी पेरूच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारचा हातखंडा मिळवला असून त्याने पिकवलेल्या पेरू विक्रीसाठी बाजारपेठेत जाण्याची गरज नसून ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या पेरू विकले जातात. नेमके सुनील याने कशा पद्धतीने पेरू पिकाचे नियोजन केले आहे? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
पाच वर्ष अगोदर पेरू लागवडीचा घेतला निर्णय
सुनील कंडेल यांनी पाच वर्षांपूर्वी आर्थिक उत्पन्न वाढावे याकरता पेरूची बाग लावली. यामध्ये त्यांनी एका एकर क्षेत्रात थाई पेरू जातीचे सुमारे 400 झाडांची लागवड केली. यातून त्यांना आता वर्षातून दोनदा पेरूचे उत्पादन मिळत असून एका झाडापासून एका वर्षाला 50 ते 60 किलो पेरूचे उत्पादन मिळते.
विशेष म्हणजे ते एका एकर पेरूच्या बागेतून तब्बल 20 टन उत्पादन घेतात व त्या माध्यमातून त्यांना कमीत कमी आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. एका एकर पेरू बागेचे नियोजनासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च येतो. म्हणजेच एक एकर शेतीतून एका वर्षात निव्वळ सात लाखांचा नफा त्यांना मिळतो.
या जम्बो पेरूचे व्यवस्थापन कसे ठेवले आहे?
सुनील कंडाले यांनी पिकवलेल्या पेरूचा आकार मोठा असून एकटा माणूस एक पेरू पूर्ण खाऊ शकत नाही. या मोठ्या आकाराच्या पेरूचे नियोजन करताना जेव्हा पेरू लिंबाच्या आकारापेक्षा लहान असतात तेव्हा त्यांची निवड केली जाते. झाडावर ज्या फळांची निवड होते त्यावर आवरण लावले जाते.
जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या पाऊस किंवा गारपीट आणि वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा विपरीत परिणाम होऊ नये याकरिता आवरणाचा फायदा होतो. तसेच तापमानाचा समतोल राखता यावा याकरिता धुके विरोधी पॉलिथिन आणि नंतर त्यावर कागद बांधला जातो.
जेणेकरून यामुळे पेरूवर कोणत्याही प्रकारचा कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. आपण साधारणपणे पेरूचे वजन पाहिले तर चार ते पाच पेरू मिळून एक किलो वजन भरते. परंतु सुनील यांनी पिकवलेल्या जम्बो आकाराच्या पेरूचे वजन हे तब्बल एक किलो पेक्षा जास्त भरते.
काही फळांचे वजन तर दीड किलो पर्यंत देखील आहे. हा पेरू दिसायला सुंदर आहेच परंतु खायला त्याची चव देखील खूपच चांगली आहे. त्यामुळे सुनील कंडेला यांना त्या पेरूंचे विक्री करण्यासाठी किंवा मार्केटिंग करिता बाजारपेठेत जाण्याची गरज नसून त्यांनी पिकवलेली पेरू ऑनलाइन घरबसल्या विकले जातात. या एका पेरू ची किंमत 150 ते 250 रुपये असून यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.
पेरूची केली जाते ऑनलाइन मार्केटिंग
सुनील कंडेला यांची पेरू या फळासाठीची मार्केटिंगची पद्धत देखील तितकीच महत्त्वाचे आहे. त्यांनी पिकवलेले पेरू कोणत्याही प्रकारच्या बाजारपेठेत किंवा दुकानात विक्री होत नाहीत. तर ते थेट ऑनलाईन रिटेलिंगद्वारे विकले जातात.
सुनील कंडेला यांची ऑनलाईन मार्केटिंगची डिलिव्हरी चेन दिल्ली, चंदिगड, पंचकुला, नोएडा आणि गुरुग्राम इत्यादी ठिकाणी विस्तारलेली आहे. या मोठमोठ्या शहरांमधून लोक ऑर्डर देतात व ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर आठ तासात पेरू संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो.
सुनील कंडेला शेतातील टाकाऊ पदार्थापासून करतात खतांची निर्मिती
पेरूचे दर्जेदार उत्पादन मिळावे याकरिता सुनील पेरू बागेच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष देतात. याकरिता मोठ्या प्रमाणावर ते सेंद्रिय खतांचा वापर करतात. परंतु सुनील यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते खते शेतातच तयार करतात. याकरिता ते शेतातील टाकाऊ पदार्थांपासून खते तयार करतात व कीटकनाशक म्हणून कडुनिंबावर आधारित औषधांचाच वापर या पेरूसाठी करतात.
ते त्यांच्या शेतामधून एकही काडीकचरा शेताच्या बाहेर जाऊ देत नाहीत. पेरूच्या झाडाची छाटणी पासून मिळालेले अवशेषांपासून ते कंपोस्ट खताची निर्मिती करतात व त्याच खताचा वापर त्याच पेरू बागेसाठी सेंद्रिय खत म्हणून केली जाते. याएवजी त्यांच्या शेतामध्ये दोन एकर लिंबू लागवड केलेली असून याकरिता देखील ते सेंद्रिय खतांचाच वापर करतात.
म्हणजेच लिंबाचे उत्पादन देखील सेंद्रिय पद्धतीनेच केले जाते. याशिवाय त्यांनी शेतामध्ये सेंद्रिय हळद तसेच मनुका व विशेष म्हणजे सफरचंदाचे देखील लागवड केलेली आहे. सुनील कंडेला यांचा सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यात देखील हातखंडा आहे. एवढेच नाही तर लिंबू फळावर प्रक्रिया करण्याचे काम देखील ते आता करत आहेत.