Harbhra Lagwad : शेतकऱ्यांनो सावधान ! हरभरा पिकाला युरिया लावू नका, होणार मोठं नुकसान ; कृषी तज्ञांचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Harbhra Lagwad : यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा त्रासदायक राहिला आहे. खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून कसेबसे शेतकऱ्यांनी पीक वाचवले मात्र शेवटी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

त्यामुळे खरिपात नुकसान झालं असलं तरी देखील रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने आणि जमिनीत पुरेशी ओल असल्याने शेतकरी बांधवांनी या रब्बी हंगामात हरभरा लागवडीला विशेष प्राधान्य दिले आहे. वाशिम जिल्ह्यातही या रब्बी हंगामात हरभरा पिक लागवड वाढली आहे.

दरम्यान, शेतकरी बांधव हरभरा पिकातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी युरियाचा सर्रास वापर करत असल्याचे निर्दशनास आले आहे. मात्र हरभरा पिकासाठी युरियाची आवश्यकता नसते असा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे युरियाच्या वापरामुळे हरभरा पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि उत्पादनात मोठी घट होऊ शकते असं देखील कृषी तज्ञ नमूद करत आहेत.

कृषी तज्ञांच्या मते हे द्विदल धान्य वर्गीय पीक आहे. या अशा पिकाला नत्राची गरज नसते. आणि युरिया हा नत्राचा एक प्रमुख स्रोत आहे. नत्राची कमतरता दूर करण्यासाठीच प्रामुख्याने युरियाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी अनावश्यक पणे युरियाचा वापर केला तर हरभरा पिकात नत्राचे प्रमाण वाढू शकते आणि यामुळे फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो.

सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात हरभरा पिक वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी हरभरा पिक फुलोरा अवस्थेत आल आहे. अशातच जर हरभरा पिकाला युरिया दिला तर पीक लुसलुशीत होण्याचा धोका वाढतो. यामुळे पिकाचा काटकपणा कमी होतो आणि किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

तसेच युरियाचा वापर केल्याने पीक स्फुरद, पलाश, झिंक व लोह इत्यादी घटक जमिनीत उपलब्ध असून सुद्धा घेऊ शकत नाही. साहजिकच या पोषक घटकांची कमतरता मग पिकात जाणवू लागते आणि उत्पादनात घट होण्याची भीती वाढते. म्हणजे युरियाचा हरभरा पिकाला अजिबातही फायदा होत नाही.

याउलट शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादनात देखील घट होते. यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकात युरियाचा अजिबात वापर करू नये असे कृषी तज्ञ नमूद करत आहेत.