Harbhra Lagwad : हरभरा लागवड केलीय नव्ह ! मग घाटेअळीचा हल्ला झाल्यास ‘हे’ काम करा ; नाहीतर यंदा….

Harbhra Lagwad : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव गहू आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. हरभरा पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. खरं पाहता हरभरा पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र अनेकदा हरभरा पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे आणि रोगांचे सावट पाहायला मिळते. यामध्ये घाटे अळीचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळे उत्पादनात निम्म्याहून अधिक घट होऊ शकते.

म्हणून या अळीवर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. घाटे अळीला अमेरीकन बोंड अळी, हिरवी बोंड अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी व तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्रात ओळखले जाते.

Advertisement

अळी काय नुकसान करते बरं 

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या लहान अळ्या सुरवातीस पानावरील आवरण खाण्यास सुरवात करतात. अशी पाने काही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. विकसित अळी कळ्या व फुले कुरतडून आपली आजीविका भागवत असते. तसेच पूर्ण वाढ झालेली अळी तोंड घाट्यात घालून आतील दाणे फस्त करत असते. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत या अळीवर वेळीच नियंत्रण मिळवण्याचा सल्ला कृषी तज्ञांकडून देण्यात आला आहे.

घाटे आळी दर दिवशी 8 ते 10 या प्रमाणात पिकावर दिसू लागल्यास आर्थिक मर्यादा ओलांडली असल्याचे समजावे आणि लवकरात लवकर उपायोजना करावी. दरम्यान उपाययोजना करण्यासाठी रासायनिक पद्धतीचा अवलंब करणे पूर्वी जाणकार लोकांचा सल्ला घ्यावा.

Advertisement

जाणकार लोकांच्या मते जैविक नियंत्रण म्हणून सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात निंबोळी अर्काची फवारणी करावी.

तसेच जैविक पद्धतीने घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. 

घाटे अळीवरील रासायनिक नियंत्रण :-

Advertisement

हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी क्लोरअँट्रानिलीप्रोल (२० एससी) २.५ मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे अळी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. मात्र कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करणे अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.