हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास असं करा नियंत्रण ; नाहीतर….

Harbhra Lagwad : खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण वाया गेला आहे. अतिवृष्टीमुळे खरिपात शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाल आहे. दरम्यान आता राज्यात हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील पिके देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. खरं पाहता राज्यात सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि धुके यामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट येऊ शकते असं सांगितलं जात आहे.

हरभरा पिकावर देखील घाटेअळी सारख्या आळींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा हल्ला झाल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषी तज्ञांकडून केले जात आहे. आज आपण घाटेअळीवर कशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी नियंत्रण मिळवले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता सध्या हरभरा पिकावर आढळून येणारी अळी ही प्राथमिक स्टेजवरील म्हणजे अंडी अवस्थेमधील आहे. अशा स्टेजवर या अळीचे नियंत्रण केल्यास शेतकऱ्यांना कमी खर्च लागणार आहे. ही अळी पिक फुलोरा अवस्थेत असताना तसेच घाटे अवस्थेत अधिक नुकसानकारक ठरते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी कोळपणी तसेच निंदणी करून हरभरा पिक तण मुक्त ठेवलं पाहिजे. या वेळी अळी आढळून आल्यास त्या शेताबाहेर काढल्या पाहिजेत. सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावले पाहिजेत. सापळ्यांमध्ये या अळीचे पतंग आढळल्यास कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

या पद्धतीने मिळवा अळीवर नियंत्रण

शेतकरी बांधवांनी या आळीवर जैविक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी हेक्टरी 50 ते 60 पक्षी थांबे बसवले पाहिजेत. तसेच पिक कळी अवस्थेत असताना पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझेंडिरेक्टिन 300 पीपीम पाच मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

याशिवाय घाटेअळी प्राथमिक अवस्थेत असताना एच.ए.एन.पी. व्ही. 500 एल. ई. 1 मिली प्रति लिटर पाण्यात 5 ग्रॅम निळ टाकून फवारणी केली पाहिजे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की फवारणी ही नेहमी सायंकाळी केली पाहिजे. तसेच जाणकार लोकांनी ज्यावेळी किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आला त्याच वेळी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे.

रासायनिक कीटकनाशकांमध्ये इमामेक्टीन बेन्झोएट 5, एसजी 4.4 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एससी 2 मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 1805 एससी 25 मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे प्रमाण नॅसपॅक पंपासाठी आहे हे या ठिकाणी शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावे. पेट्रोल पंपासाठी यापेक्षा तीन पट अधिक मात्रा वापरावी लागणार आहे. कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुरक्षिततेचे सर्व उपाय केले पाहिजेत.