Honey Bees Benefit: मधमाशांमुळे पिकांच्या उत्पादनात होते 10 टक्क्यांची वाढ! वाचा कोणत्या पिकांच्या उत्पादनात किती होते वाढ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honey Bees Benefit:- पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारचे रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर करतात. तसेच तंत्रज्ञानाचा वापर आणि पीक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील भरघोस उत्पादनास करिता खूप महत्त्वाचे आहेत. याव्यतिरिक्त काही नैसर्गिक परिस्थिती देखील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात.

यामध्ये जर आपण मधमाशांची भूमिका पाहिली तर ती पीक उत्पादन वाढीसाठी खूपच महत्त्वाची आहे. मधमाशांचे जे काही परागीभवन असते ते पीक उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते व यामुळे पाच ते दहा टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ होऊ शकते. मधमाशांचे महत्त्व याबाबतीत जर आपण पाहिले तर नुकतेच राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग प्रमुख  डॉ. सी.एस.पाटील यांनी मधमाशांबाबत जागृती होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले व त्यांचे महत्त्व देखील विशद केले.

 मधमाशांच्या परागीभवनाचे उत्पादन वाढीत महत्व

आपण जो काही आहार घेतो त्यातील एक तृतीयांश भाग हा परागीभवनाच्या माध्यमातून मिळत असतो. महाराष्ट्र मध्ये परागीभवनाची प्रक्रिया होण्याकरिता आवश्यक असलेली भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती पूरक असल्यामुळे परागीभवनाच्या मदतीने पाच ते 40% पर्यंत पीक उत्पादन वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे व ही बाब संशोधनात देखील पुढे आले आहे.

परंतु आपण पिकांवर जे काही रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतो तो वापर मधमाशांच्या जीवन चक्राकरिता खूपच नुकसानदायक असून या कीटकनाशकांचा अंश आपल्याला मधामध्ये देखील दिसून येतो. त्यामुळे ही गोष्ट टाळायची असेल तर कीडनाशक मंडळाने जी काही 29 कीडनाशके प्रमाणित केले आहे ते शेतकऱ्यांनी वापरावीत.

 मधमाशी परागीभवणामुळे कोणत्या पिकामध्ये होते किती वाढ?

परागीभवनाची प्रक्रिया ही विविध भाजीपाला पिके तसेच फळे, धान्य तसेच तेलबिया व इतर पिकांमध्ये होत असते. परागीभवनाची प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाचे असून या माध्यमातून निसर्गाचा जैविक समतोल साधला जातो. एवढेच नाही तर पिकांना उपद्रवी कीटकांपासून वाचवण्यात देखील यामुळे मदत होत असते.

बऱ्याच पिकांसाठी मधमाशांमुळे होणारे परागीभवन उत्पादन वाढीकरिता खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये काही पिकांचा विचार केला तर तेल वर्गीय मोहरी मध्ये 43%, सूर्यफुलामध्ये 32 ते 48%, करडईत 28%, तीळ 22 ते37%,सोयाबीन १९ टक्के, एरंडी 30%, जवस 17 ते 40% हे इतके उत्पादन वाढ झाल्याचे याबाबतीत जो काही अभ्यास झालाय त्यामध्ये सिद्ध झाले आहे.

 मधमाशांचे एक पोळे नष्ट केल्याने किती होते नुकसान?

मधमाशी साधारणपणे अर्थात एक किलोमीटर भागामध्ये फिरते व एक पोळी तयार करत असते. मधमाशींमध्ये फुलोरी मधमाशी ही जी काही असते ती परागीभवनासाठी अत्यंत फायद्याचे असते. अशा प्रसंगी जर आपण मधमाशांचे एक पोळे नष्ट केले तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट करण्यासारखे आहे.

आग्या मधमाशीच्या पोळ्यामध्ये पन्नास हजार ते एक लाख मधमाश्या असतात. अशाप्रसंगी जर आपण जाळ किंवा धूर करून माशा उडवले आणि मध काढले तर जवळपास 25 एकर मधील जंगल नष्ट होण्याबरोबर या माध्यमातून नुकसान होत असते. त्यामुळे जर तुम्हाला मध काढायचे असेल तर शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.

मधाच्या पोळ्यामध्ये जो काही मध असलेला भाग असतो तो फुगीर दिसतो व त्याला पण खांदा असे देखील म्हणतो. हा भाग वेगळा काढून जर आपण मधमाशीचे पोळे वाचवण्याचा प्रयत्न केला तर ते पोळ्यावर पुन्हा मधमाशी येण्याची शक्यता वाढते. तसेच सातेरी, मेलीफेरा आणि फुलोरी मधमाशी या पाहता येणाऱ्या मधमाश्या आहेत. अशी देखील माहिती या क्षेत्रातील तज्ञांनी दिली.

यावरून आपल्याला दिसून येते की, मधमाशांचे परागीभवन हे पिकांच्या उत्पादन वाढीसाठी किती फायद्याचे आहे.