अतिरिक्त उस डोकेदुखी नाही तर; अतिरिक्त पैसे कमवण्याचे साधन; अनेक शेतकऱ्यांनी छापलेत लाखों, जाणुन घ्या कसं….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 money news  :- राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र अतिरिक्त उसाचा (Extra sugarcane) प्रश्न ऐरणीवर आहे. 

असे असले तरी, अजूनही अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर रामबाण तोडगा बघायला मिळत नाही. अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane growers) ऊस पंधरा महिने उलटून देखील फडातच उभे आहेत.

यामुळे सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ देखील निर्माण झाला आहे. अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यावर (Sugarcane mills) घालवण्यासाठी मोठी पायपीट देखील केली आहे, मात्र तरीदेखील अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमच आहे.

एकीकडे अतिरिक्त ऊस कारखान्यात घालवता-घालवता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत तर दुसरीकडे काही ऊस उत्पादक शेतकरी अतिरिक्त उसाचे अतिरिक्त पैसे देखील छापत आहेत. यामुळे काही शेतकर्‍यांना अतिरिक्त ऊस फायद्याचा देखील ठरत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) कळंब तालुक्याच्या (Kalamb) एका ऊस उत्पादक शेतकऱ्याला अतिरिक्त ऊस मोठा फायद्याचा ठरत असून सदर शेतकरी अतिरिक्त उसातून लाखो रुपयांचे उत्पन्न कमी येत आहे.

तालुक्याच्या मौजे कन्हेरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी महादेव कवडे यांना 15 वर्षांपूर्वी अतिरिक्त ऊस संबंधी समस्येला तोंड द्यावे लागले होते.

त्यावेळी या शेतकऱ्याने अतिरिक्त ऊस घालवण्यासाठी एक वेगळा मार्ग चोखाळला होता आणि खऱ्या अर्थाने त्यावेळी केलेला या शेतकऱ्याचा प्रयोग आज या शेतकऱ्याला फायदेशीर ठरत आहे.

पंधरा वर्षांपूर्वी साखर कारखान्यांकडून या शेतकऱ्याचा ऊसतोडणीसाठी टाळाटाळ केली जात होती एवढेच नाही या शेतकऱ्याला पंधरा वर्षांपूर्वी देखील कारखान्यात ऊस देताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. यामध्ये प्रमुख होते उस बिलाचे पैसे (The money for that bill) मिळवण्यासाठी होत असणारी धावपळ.

ऊस तोडणीसाठी होत असणारे टाळाटाळ तसेच उस बिलाचे पैसे मिळवण्यासाठी होत असणारी तारेवरची कसरत या दोन्ही बाबी लक्षात घेऊन या शेतकऱ्याने पंधरा वर्षांपूर्वी स्वतःचे गुऱ्हाळ सुरू केले होते. आज या शेतकऱ्याला या गुऱ्हाळाचा मोठा फायदा होत आहे.

ऊस उत्पादक शेतकरी महादेव कवडे यांनी सुरू केलेल्या गुऱ्हाळ्यात ते केमिकल विरहित गुळाची निर्मिती करत असतात. त्यांचा गुळ केमिकल विरहित असल्याने या गुळाला मोठी मागणी असून यातून ते चांगला नफा कमवीत आहेत.

यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळत आहे तसेच उस घालवण्यासाठी होत असणारी धावपळ देखील टाळता आली आहे. यामुळे ऊसाचे गुऱ्हाळ या शेतकऱ्यासाठी एक फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय ठरत आहे.

महादेव कवडे गेल्या अनेक वर्षांपासून ऊस या नगदी पिकांची लागवड करीत आले आहेत. त्यांना याआधी देखील ऊस तोडणीसाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.

यामुळे त्यांनी ऊस तोडणीचे नियोजन करण्यासाठी तसेच उसाच्या शेतीतून कोणाच्याही मागे न धावता चांगले उत्पन्न प्राप्त करण्यासाठी अभ्यास सुरू केला. त्यावेळी त्यांना गुऱ्हाळ सुरू करण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी त्यावेळी केलेला प्रयोग आजतागायत त्यांना फायद्याचा ठरत आहे.

महादेव कवडे यांच्याकडे पंधरा वर्षांपूर्वी पुरेसे भांडवल नव्हते. त्यामुळे त्यांनी फक्त पाच गुंठे क्षेत्रात गुऱ्हाळ सुरु केले. तेव्हापासून ते आजतागायत त्यांचे हे काम कुठल्याही अडचणी विना सुरूच आहे.

विशेष म्हणजे त्यांचा गूळ केमिकल विरहित असल्याने बाजारपेठेत याला विशेष मागणी आहे. 15 वर्षांपूर्वी केलेल्या या प्रयोगामुळे महादेव यांच्या घरच्या उसाचा प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लागला असून त्यातून त्यांना दरवर्षी सहा लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

महादेव यांनी इतर शेतकऱ्यांना उसाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी असा नावीन्यपूर्ण प्रयोग सुरु देखील केला आहे.

यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगभलं होत असून त्यांना उस घालवण्यासाठी विशेष अशी मशक्कत करावी लागत नाही. महादेव यांच्या उदाहरणावरून, अतिरिक्त उस डोकेदुखी नसून अतिरिक्त पैसे कमावण्याचे साधन असल्याचे स्पष्ट झाले आहे.