Rose Farming: सरकारी अनुदान घेऊन पॉलिहाऊसमध्ये करा डच गुलाबाची लागवड आणि लाखोत कमवा! दररोज मिळू शकतो 10 ते 15 हजार रुपयांचा नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rose Farming:- सध्या शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकांचे लागवड या माध्यमातून कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर क्रांती घडवताना दिसून येत आहेत. शेतीच्या नवनवीन पद्धती तसेच पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आलेले तंत्रज्ञान यांच्या वापराने शेती आता सुलभ झाली आहेच.

परंतु त्या मानाने भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळायला लागलेले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकांना फाटा देत विविध पद्धतीच्या भाजीपाला आणि फुल पिकांच्या शेतीकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला असून त्या खालोखाल फळबागांची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

यामध्ये खास करून जर आपण फुलशेती पाहिली तर ती पॉलिहाऊस सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड करून शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध होताना आपल्याला दिसून येत आहेत.

याच पद्धतीने तुम्हाला देखील पॉलिहाऊसच्या माध्यमातून फुलशेती करायची असेल तर तुमच्याकरिता डच गुलाबाची लागवड फायदेशीर ठरू शकते. कारण डच गुलाबाला बाजारपेठेत देखील भरपूर मागणी असते व याचा वापर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. विशेष म्हणजे पॉलिहाऊस मध्ये या फुलाच्या लागवडीकरिता सरकारकडून अनुदान देखील उपलब्ध आहे.

 सरकारी अनुदान घेऊन पॉलिहाऊस उभारा डच गुलाबाची लागवड करा

पॉलिहाऊस उभारायला जास्त प्रमाणात खर्च येतो हे आपल्याला माहिती आहे. साधारणपणे एकरभर क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पॉलिहाऊस उभारायचे असेल तर  70 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असतो असं म्हटले जाते. त्यावर तुम्हाला राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माध्यमातून 50 टक्के अनुदान मिळते. अशा पद्धतीने तुम्ही पॉलिहाऊस उभारून डच गुलाबाची लागवड करू शकतात.

या गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी पॉलिहाऊस मध्ये सुमारे 32 ते 35 अंशांचे तापमान असणे गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये जर या पिकाची काढणी केली तर ती फायद्याची ठरते. डच गुलाबाचे वैशिष्ट्य म्हणजे याला भारतात मागणी आहेच परंतु त्या व्यतिरिक्त नेदरलँड, जपान आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये देखील भरपूर प्रमाणात मागणी आहे.

त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून डच गुलाबाचे उत्पादन घेऊन तुम्ही विदेशात याचे निर्यात करून चांगला पैसा मिळवू शकता. साधारणपणे एकरभर क्षेत्रातून दररोज 45 ते 50 किलो गुलाबाची फुलांचे उत्पादन मिळते व ही फुले चांगल्या किमतीमध्ये बाजारपेठेत विकली जातात.

साधारणपणे चांगला दर आणि फुलांचे उत्पादन दर्जेदार असेल तर शेतकऱ्यांना दररोज दहा ते वीस हजार रुपयांचा नफा एक एकर पॉलिहाऊस च्या माध्यमातून मिळणे शक्य आहे.

जर आपण पुणे जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली जाते हे आपल्याला माहिती आहे व इकडच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी फुल लागवडीतून खूप चांगल्या पद्धतीने कमाई केल्याचे आपल्याला दिसून येते.