रब्बी हंगामात मक्याचे एकरी 40 ते 50 क्विंटल उत्पादन मिळवायचे तर ‘या’ वाणाची पेरणी ठरेल फायदेशीर! मिळेल लाखोत उत्पन्न

केंद्र सरकारच्या माध्यमातून आता इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याने व त्यासोबतच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकरिता देखील मक्याची मागणी जास्त असल्याने बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळे रब्बी हंगामात मक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Ajay Patil
Published:
corn crop

Corn Crop Variety:- महाराष्ट्र मध्ये मका पिकाची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बी हंगामामध्ये गहू तसेच हरभरा खालोखाल मक्याची लागवड दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे व मक्याला बाजारभाव देखील चांगला मिळत असल्याने येणाऱ्या काळात मका लागवड फायद्याचे ठरू शकते.

तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आता इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याने व त्यासोबतच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकरिता देखील मक्याची मागणी जास्त असल्याने बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळे रब्बी हंगामात मक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर मका लागवडीपासून भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याकरिता व्यवस्थापन गरजेचे असतेस. परंतु सुधारित आणि चांगले उत्पादनक्षम वाणांची निवड देखील महत्त्वाची ठरते. अनुषंगाने या लेखात आपण मक्याच्या रब्बी हंगामात लागवड योग्य काही सुधारित वानांची माहिती बघणार आहोत.

मक्याचे हे वाण देतात 40 ते 50 क्विंटल उत्पादन

1- पायोनियर P3524- रब्बी हंगामामध्ये या वाणाची लागवड करणे शक्य असून लागवडीनंतर सरासरी 120 दिवसात काढणीस तयार होतो. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर मक्याच्या या वाणापासून 40 ते 50 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीचे विशेष म्हणजे यावर लष्करी अळीचे प्रमाण देखील कमी राहते.

2- ऍडव्हंटा PAC 741- रब्बी हंगामात लागवडीसाठी हा वाण देखील खूप फायद्याचा असून उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर एकरी 40 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्यास सक्षम आहे. पेरणीनंतर साधारणपणे 120 दिवसात काढणीस तयार होतो. मात्र या वाणाला थोडे पाणी जास्त लागते व कडब्याचे उत्पादन देखील चांगले मिळते.

3- सिजेंटा NK 6240 प्लस- मक्याची ही जात रब्बी हंगामात लागवडीस योग्य असून लागवडीनंतर सरासरी 120 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून जवळपास 50 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळू शकते. या जातीचे कणीस वजनाने जास्त असते व त्यामुळे उत्पादन देखील जास्त येते. मक्याच्या या जातीला मात्र कमी पाणी लागते.

4- अडवांटा ADV 757- रब्बी हंगामासाठी ही जात फायदेशीर असून साधारणपणे 110 ते 120 दिवसात काढणीस तयार होतो. कडब्याच्या उत्पादनासाठी हा चांगला वाण असून धान्य व चारा अशा दोन्ही उद्देशाने या जातीची लागवड फायदेशीर ठरते. या जातीच्या लागवडीपासून 41 ते 45 क्विंटल उत्पादन मिळते.

5- पिनॅकल डीकाल्ब- मक्याची ही जात देखील लागवडीसाठी उपयुक्त असून लागवडीनंतर साधारणपणे 110 ते 120 दिवसात काढणीस तयार होते व सरासरी एकरी 40 ते 45 क्विंटल उत्पादन मिळते. परंतु या जातीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मात्र जास्त प्रमाणात होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe