शेतकऱ्याने केला भन्नाट जुगाड! विज नसली तरी चालेल शेतातील मोटर, पहा तुफान व्हायरल झालेला व्हिडिओ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेती,पिके आणि पाणी यांचा एक कनिष्ठ संबंध असून पिकांपासून भरगोस उत्पादनाकरिता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरीमध्ये पाणी असले तरी त्याला पिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आपल्याला विजेची आवश्यकता असते. कारण वीज नसेल तर इलेक्ट्रिक पंप कार्यान्वित होणार नाही व पाणी शेतापर्यंत पोहोचणार नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु सध्या विजेची टंचाई किंवा विजेच्या लपंडावाची समस्या पाहिली तर शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेले आपल्याला बघायला मिळतात.

बऱ्याचदा रात्रीचा विजापुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्याकरिता जायला लागते. त्यामुळे पिकांना पाणी जितके आवश्यक आहे तितकेच पिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी वीज आवश्यक आहे. परंतु जर विजेशिवाय इलेक्ट्रिक मोटर चालली तर किती छान होईल?

असा विचार देखील अनेक जणांच्या मनात येत असेल. अगदी याच अनुषंगाने आपण पाहिले तर एका शेतकऱ्याने असा जुगाड करून दाखवला आहे की कुठल्याही लाईट शिवाय ही मोटार चालते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा हा व्हिडिओ असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्याचा हा भन्नाट जुगाड पाहिला परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे.

 लाईट शिवाय चालेल मोटर

इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने भन्नाट जुगाड केला असून या जुगाडा मुळे विजेशिवाय मोटर चालणे शक्य आहे.  बरेच शेतकरी शेतीतील कामे सोपे व्हावीत व कमीत कमी वेळ लागावा याकरिता अनेक कामांसाठी जुगाड तयार करतात. यासंबंधीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून  या व्हिडिओमध्ये एक तरुण इंजिन हाताने सुरू करीत आहे व लाईट शिवाय जुगाड करून मोटार सुरू होत असल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आलेले आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्या ठिकाणी एक मोटर व एक बॅटरी असे साहित्य सुरुवातीला दिसत आहे व यामध्ये एकदा मोटर सुरू झाल्यानंतर मोटर मधून पाणी सुरू झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या बोर्ड मध्ये पटकन बल्ब देखील लागले आहे.

तर जे पाणी मोटर मधून बाहेर आले आहे ते पाणी थेट एका मशीन वरती पाडले जात आहे व या साह्याने पुढचे मशीन गतीने गोल फिरत आहे. या सगळ्या प्रक्रियेतून ज्या काही पाणी बाहेर पडत आहे ते बाजूच्या शेतामध्ये जात आहे. हे मशीन वर पडणारे पाणी लाईट तयार करत असून यामुळेच ती मोटर कार्यान्वित होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

 पहा हा प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ