सध्या कृषी क्षेत्रासमोर बदलते हवामान आणि अवकाळी पाऊस,गारपीट तसेच वादळी वारे इत्यादी नैसर्गिक समस्यांचे मोठ्या प्रमाणात आव्हान आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न हिरावले जाते व शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.
या सगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये पिकांचा पॅटर्न बदलल्याच्या दृष्टिकोनातून कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीकडे आता शेतकरी वळू लागले आहेत व बऱ्याच पिकांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड यशस्वी देखील करत आहेत.
याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या आढळगाव या गावच्या अजय काळे, गणेश काळे आणि देऊळगाव त्या गावचे शेतकरी दत्ता दांगडे यांनी बडीशोप लागवड प्रायोगिक तत्त्वावर करून ती यशस्वी केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला बडीशेप लागवडीचा प्रयोग यशस्वी
हवामान आणि पाण्याची परिस्थिती कमालीची बदलत असल्यामुळे कृषी विद्यापीठे आणि शेतकरी आता पीक पद्धती आणि पिकांचा पॅटर्न बदलल्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या आढळगाव येथील अजय व गणेश काळे आणि देऊळगाव
या गावचे शेतकरी दत्ता दांगडे यांनी बडीशोप लागवड प्रायोगिक तत्त्वावर केली व दहा गुंठे क्षेत्रात तीन महिन्याच्या कालावधीत प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी बडीशेप लागवडीचा प्रयोग यशस्वी केल्यामुळे या पट्ट्यात बडीशोप लागवड येणाऱ्या कालावधीत वाढू शकते.
प्रामुख्याने बडीशेप लागवड ही भारतातील राजस्थान तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या काही भागांमध्ये केली जाते. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.
एका एकर क्षेत्रामध्ये बडीशोप लागवडीकरिता 800 ग्राम बडीशेपचे बियाणे लागते व त्या माध्यमातून सात ते आठ क्विंटल उत्पन्न निघते. जर आपण बडीशेपचा दर पाहिला तर सरासरी प्रतिक्विंटलला 30 ते 55 हजार रुपयांपर्यंत आहे.
कसे करावे लागते लागवड व खतांचे नियोजन?
बडीशेप लागवड करायची असेल तर ती तीन फूट बाय एक फूट सरीवर टोकन पद्धतीने करणे किंवा तीन फुटावर बेड टाकून त्यावर झिकझॉक पद्धतीने लागवड करणे महत्त्वाचे ठरते.
खत नियोजन करताना खतामध्ये साधारणपणे 25 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश असे खत देणे गरजेचे असते. बडीशेप पिकावर प्रामुख्याने भुरी आणि मावा या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. या रोग आणि किडीचा नियंत्रणाकरिता निमतेल आणि एम 45 बुरशीनाशक फवारणी पुरेशी ठरते.