Irrigation Scheme: वैयक्तिक शेततळ्यासाठी सोडतीत नाव आले तर ‘ही’ गोष्ट लवकर करा! नाहीतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Irrigation Scheme:- केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून कृषी आणि कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता महत्वपूर्ण योजनांची आखणी करण्यात आलेली असून अशा योजना राबवण्यात देखील येत आहेत.शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा असतात त्या उभारणी करिता अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत  शेतकऱ्यांना करण्यात येते.

या कृषी क्षेत्राच्या योजनाच्या अनुषंगाने जर आपण पाहिले तर सूक्ष्म सिंचन किंवा शेतीला पाण्याची उपलब्धता होण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित असलेल्या योजना या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.या योजनांमध्ये बऱ्याच योजना केंद्र सरकारच्या आहेत

परंतु यामध्ये राज्य सरकारच्या देखील अनेक योजना असून शेतीला मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता व्हावी याकरिता या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे शेततळे म्हणजेच वैयक्तिक शेततळे योजना ही एक महत्त्वाची योजना असून ती सध्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.

 वैयक्तिक शेततळे योजनेचे स्वरूप

शेतीमध्ये सिंचनाच्या सुविधा वाढाव्यात या दृष्टिकोनातून शेततळे हा एक पाण्याचा उपलब्ध स्त्रोत असून शेतकऱ्यांना शेततळे उभारता यावी याकरिता या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. दुष्काळावर मात करण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची समजली जाते.

साधारणपणे या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर किमान 0.6 हेक्टर क्षेत्र असणे गरजेचे आहे व शेततळे खोदण्यासाठी ती जमीन योग्य असावी. शासनाच्या शेततळे, सामूहिक शेततळे किंवा इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ हा घेतलेला नसावा.

 योजनेनुसार शेततळे करताना कोणती काळजी घ्यावी लागते?

तुम्हाला जर शेततळे खोदायचे किंवा तयार करायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. कारण शेततळ्याची जागा निवडताना देखील काही तांत्रिक निकष यामध्ये महत्त्वाचे असतात. यामध्ये जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे

तसेच काळी जमीन ज्यामध्ये चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीत शेततळ्यासाठी  योग्य समजल्या जातात व अशा जमिनीची निवड करण्यात यावी व पाणलोट क्षेत्रात तसे टंचाईग्रस्त गावातील लाभ क्षेत्रात शेततळे घेण्यात यावीत.

 या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रामुख्याने शेत जमिनीचा सातबारा आणि आठ अ चा उतारा, आधार कार्डची झेरॉक्स तसेच बँक पासबुकची झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला इत्यादी कागदपत्र आवश्यक असतात.

 लाभार्थ्याची निवड कशी केली जाते?

1- या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सीएससी केंद्रावर जाऊन https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो.

2- ऑनलाइन अर्ज करताना महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करणे गरजेचे असते.

3- अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर जे काही अर्ज करतात त्या अर्जांमधून संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरी म्हणजे सोडत काढण्यात येते व त्या माध्यमातून लाभार्थीची निवड होते.

 शेततळे योजनेमध्ये या गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात

कृषी सहायकांनी जी काही शेततळे घेण्यासाठी किंवा उभारण्यासाठी जागा निश्चित केलेली असते त्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहते. शेततळ्याचे काम सुरू करण्याचे आदेश किंवा पूर्वसंमतीचे पत्र मिळाल्यानंतरच काम सुरू करावे लागते. हे पूर्व संमतीचे पत्र जेव्हा मिळते त्यानंतर शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहते.

 लॉटरीमध्ये लाभार्थी निवड झाल्यानंतर हे काम अवश्य करावे

महाडीबीटीतून कृषी संदर्भातील योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरमहा लॉटरी काढून लाभार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर लाभार्थ्याची निवड झाली तर संबंधित व्यक्तीने ताबडतोब सातबारा आणि आठ अ चा उतारा,

बँक खात्याची झेरॉक्स आणि आधार कार्ड अपलोड करणे गरजेचे असते. परंतु दिलेल्या मुदतीमध्ये जर ही कागदपत्रे अपलोड केले नाहीत तर लाभार्थ्याची निवड रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे दिलेल्या मुदतीत कागदपत्र अपलोड करणे खूप गरजेचे आहे हे कायम शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे.