भारीचं की रावं! ‘या’ शेतकऱ्याने उत्पादीत केले पिवळ्या कलरचे कलिंगड; 25 रुपये किलोचा मिळाला भाव; वाचा याविषयी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi news : भारतात शेती (Farming) हा बारमाही केला जाणारा व्यवसाय आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या आपला उदरनिर्वाह शेती व्यवसायावर भागवत आहे. यामुळे शेती हा देशाचा प्रमुख व्यवसाय म्हणून प्रारंभीपासून ओळखला जातो. सध्या देशातील शेतकरी बांधव काळाच्या ओघात या आपल्या प्रमुख व्यवसायात मोठा बदल करत आहेत.

आता शेती व्यवसायात विविधता बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव (Farmers) आता पीकपद्धतीत (Crop System) देखील बदल करीत आहेत. विशेष म्हणजे पीकपद्धतीत केलेला बदल शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

पीक पद्धतीत बदल केला तर निश्चितच चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे उत्तर प्रदेश राज्यातील (Uttar Pradesh) एका शेतकऱ्याने. राज्यातील कासगंज जिल्ह्यातील गंजडुंडवारा येथील शेतकरी रामप्रकाश यांनी अल्प कालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या पिवळ्या कलिंगड पिकाची (Yellow Watermelon Farming) शेती करून चांगले उत्पादन मिळवले आहे.

विशेष म्हणजे या शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या पिवळे कलिंगड लोकांच्या पसंतीस खरे उतरत आहे. रामप्रकाश यांनी उत्पादित केलेले कलिंगड बांधावरच ग्राहक खरेदी करत असल्याने रामप्रकाश यांना मोठा फायदा होत आहे.

रामप्रकाश यांच्या मते, त्यांनी उत्पादित केलेले पिवळे कलिंगड इतर सामान्य कलिंगडापेक्षा चवीला वरचढ असून यामध्ये औषधी गुणधर्म देखील अधिक आहेत. एवढेच नाही हे कलिंगड सामान्य कलिंगडापेक्षा अधिक गोड असल्याचे त्यांनी सांगितले. रामप्रकाश यांनी लावलेले पिवळे सरस्वती जातींचे कलिंगड वरून पिवळ्या कलरची असते मात्र मध्ये त्यांचा लगदा लाल कलरचाच असतो.

25 रुपये प्रति किलोचा भाव
प्रयोगशील शेतकरी रामप्रकाश यांनी सांगितले की, ते गेल्या अनेक वर्षांपासून टरबुजाची शेती करत आहेत. पूर्वी ते हिरवा टरबूजची लागवड करत असतं, पण जेव्हा त्यांना पिवळ्या टरबूजाबद्दल माहिती मिळाली.

तेव्हा त्यांनी शेतीत काहीतरी हटके करायचे म्हणून पिवळे कलिंगड लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि सरस्वती या जातीच्या कलिंगडाची शेती सुरू केली. हिरव्या टरबूजांच्या तुलनेत हे पिवळे टरबूज महाग विकले जात असल्याचा दावा केला जातो.

सध्या रामप्रकाश त्यांनी उत्पादित केलेले पिवळे टरबूज 25 रुपये किलोने विकले जात आहे. विशेष म्हणजे या टरबूजला मागणी देखील अधिक आहे. सामान्य हिरवे टरबूज 8 ते 10 रुपये किलोने विकले जाते म्हणजेच पिवळे कलिंगड दुप्पट दराने विक्री केले जात आहे. मात्र असे असले तरी याच्या शेतीसाठी खूप अधिक मेहनत करावी लागत असल्याचे ते सांगतात. सेंद्रिय खत टाकून या पिकासाठी बेड बनवावे लागतात.

मित्रांनो सामान्य कलिंगडप्रमाणेचं पिवळे कलिंगड देखील अल्प कालावधीत काढणीसाठी येणारे पीक आहे. हे पीक मात्र दोन महिन्यात काढणीसाठी तयार होते. रामप्रकाश सांगतात की, त्यांचे पिवळे टरबूज घाऊक बाजारात विकण्यासाठी जायचे काही कामच नाही, कारण की किरकोळ व्यापारीच त्यांच्या बांधावर हजेरी लावून टरबूज खरेदी करत आहेत. पिवळ्या टरबूजाच्या लागवडीसाठी प्रतिबिघा 10 हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी रामप्रकाश सांगतात. म्हणजेच या पिवळ्या कलिंगडसाठी एकरी 30 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. निश्चितच शेती व्यवसायात बदल केला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.