Keshar Lagvad:- तंत्रज्ञानामुळे आता कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होऊ लागली असून शेती क्षेत्र देखील याला अपवाद नाही. कारण शेतीमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाने शिरकाव केला असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादन घेऊ लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराने आता जम्मू काश्मीर आणि हिमाचल सारख्या थंड प्रदेशात विकणाऱ्या सफरचंदाची लागवड देखील महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवली आहे.
आता यामध्ये जर आपण केशर लागवडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर साधारणपणे काश्मीरमध्येच केशरची लागवड यशस्वी होते.कारण त्या ठिकाणाचे जे काही तापमान असते ते तापमान केशर लागवडीसाठी उपयुक्त असून थंड हवामान केशर लागवडीकरिता उपयुक्त ठरते.
परंतु काश्मीर व्यतिरिक्त आता भारतातील अनेक राज्यांमध्ये बऱ्याच व्यक्तींनी घराच्या खोलींमध्ये लागवडीसाठी आवश्यक तापमान मेंटेन ठेवून केशर लागवड यशस्वी केल्याचे आपण वाचले असेल व हे नवीन तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.
अगदी याच पद्धतीने जर आपण मध्य प्रदेश राज्यातील इंदूर जिल्ह्यातील जैस्वाल दाम्पत्याचा विचार केला तर त्यांनी घरालाच एक मिनी काश्मीरचे स्वरूप दिले व एरोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करत घरातच केशर लागवड यशस्वी केली आहे.आज त्यांनी लागवड केलेल्या केशरला फुले येऊ लागली असून त्याचे धागे देखील आता तयार व्हायला लागले आहेत.
इंदोरच्या जैस्वाल दांपत्याने घरात यशस्वी केली केशर लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की मध्य प्रदेश राज्यातील इंदूर येथे राहणारे अनिल जैस्वाल त्यांनी केशर लागवड करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी घरामध्येच स्पेशल लागवडीला उपयुक्त असलेले हवामान तयार करून केशर लागवड यशस्वी केली आहे.
केशर लागवडी मागील त्यांचा निर्णय जर बघितला तर ते काही काळापूर्वी काश्मीरला गेले होते व त्या ठिकाणी त्यांनी केशरची लागवड बघितली तेव्हा त्यांच्या मनामध्ये आले की, आपण देखील केशरची लागवड करावी. त्यामुळे इंदूरमध्येच त्यांनी केशर साठी आवश्यक असलेले तापमान आणि हवामानाची परिस्थिती निर्माण करून केशर लागवड करण्याचा निर्णय घेतला.
याकरिता जम्मू-काश्मीरमधील पंपोर या ठिकाण हुन त्यांनी केशर लागवडीसाठी आवश्यक असलेले बल्ब विकत घेतले. याकरिता कृत्रिम हवामानाची एक खोली केशरची लागवडीकरिता तयार केली.या खोलीमधील तापमान आठ ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवण्यासाठी प्रयत्न केले. सप्टेंबरमध्ये त्यांनी केशरची लागवड सुरू केली आहे.
केशर लागवडीकरिता त्यांनी 320 स्क्वेअर फुट खोली तयार केली व त्याकरिता सहा लाख रुपये त्यांना खर्च आला. केशर लागवडीसाठी आवश्यक असणारे केशर बल्ब ऑर्डर करण्याकरिता सुमारे 13 लाखाचा खर्च त्यांनी केला.
आज त्यांच्या या केशरला फुले आले असून त्यातून त्यांना दोन किलो केशरचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. पिकवलेले हे केशर ते ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विकण्याची प्लॅनिंग करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विक्री करण्याचा आहे प्लॅनिंग
आज जर आपण भारतीय बाजारपेठेतील केशरची किंमत बघितली तर ती प्रति किलोला पाच लाख रुपये इतके प्रचंड आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये केशरची किंमत पाच लाख नव्हे तर तब्बल आठ लाख रुपये प्रतिकिलो पर्यंत देखील पोहोचू शकतो.त्यामुळे आता अनिल जैस्वाल यांनी पिकवलेले केशर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकण्याचा विचार करत आहेत.
यावरून आपल्याला दिसून येते की जर व्यक्तीमध्ये एखादी अशक्य गोष्ट शक्य करण्याची इच्छाशक्ती असली व त्याकरिता योग्य नियोजन केले तर व्यक्ती नक्कीच यशस्वी होते हे आपल्याला दिसून येते.