John Deere 5405 Tractor: हे आहे सर्वात महागडे ट्रॅक्टर! शेतीतील अवघड कामांसाठी आहे उपयुक्त, वाचा किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

John Deere 5405 Tractor :- शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून अनेक प्रकारची यंत्रे शेतीमध्ये विविध कामांसाठी वापरले जातात. यामध्ये ट्रॅक्टर हे यंत्र सर्वात जास्त प्रमाणात शेतीसाठी फायद्याचे आहे. कारण शेतीची पूर्व मशागत असो की तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत न्यायचा असो याकरिता ट्रॅक्टरची आवश्यकता भासते.

या अनुषंगाने जर आपण विचार केला तर विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर बाजारपेठेमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत व वैशिष्ट्ये वेगवेगळे असतात. साधारणपणे जर आपण सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरची सरासरी किंमत पाहिली तर ती पाच ते सात लाख रुपयांच्या दरम्यान असते. परंतु जॉन डियर 5405 या ट्रॅक्टरची किंमत चक्क बावीस लाख रुपये इतकी आहे. नेमकी असे काय या ट्रॅक्टरमध्ये आहे की त्याची किंमत एवढी जास्त आहे? याचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 हे आहे सर्वात महागडे ट्रॅक्टर

जर आपण वैयक्तिक वापरासाठी जर ट्रॅक्टरचा वापर करतो तर साधारणपणे 50 एचपी क्षमतेपेक्षा कमी असलेल्या ट्रॅक्टरची आपण निवड करतो. परंतु जर तुम्हाला ट्रॅक्टर भाड्याने म्हणजेच व्यावसायिक वापरासाठी घ्यायचे असेल तर याकरिता हेवी ट्रॅक्टरची आवश्यकता भासते. यामध्ये जर आपण जॉन डियर 5405 या ट्रॅक्टरचा विचार केला तर हे 65 एचपीचे ट्रॅक्टर असून याची किंमत 22 लाख रुपये इतकी आहे.

या ट्रॅक्टरला तुम्ही शेतीशी संबंधित असलेले सर्व उपकरण जोडू शकतात. कोणत्याही मोठ्या प्रकारचे उपकरण या ट्रॅक्टरला जोडून तुम्ही कितीही कठीण काम करू शकतात. जर तुमच्याकडे 40 ते 50 एकर जमीन असेल तर तुमच्यासाठी हे ट्रॅक्टर खूप फायद्याचे आहे. 22 लाख रुपये किमतीचे हे ट्रॅक्टर घेतल्यानंतर जर तुम्ही दररोज चार ते पाच हजार रुपयांचा व्यवसाय केला तर दोन ते अडीच वर्षात तुम्ही हे ट्रॅक्टर नील करू शकतात.

या ट्रॅक्टरला 80 लिटरची इंधनक्षमता असलेली टाकी देण्यात आली असून जर तुम्ही 80 लिटरचे टाकी पॅक केली तर तुम्ही आठ एकर रोटर या माध्यमातून मारू शकतात. जर तुम्ही या ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करायचे ठरवले तर प्रति एकर करिता 15 लिटर डिझेल लागते. या ट्रॅक्टरच्या मायलेजचा विचार केला तर ट्रॅक्टर चालवण्याची पद्धत, हे कशा पद्धतीने चालवले जात आहे इत्यादीवर जास्त करून अवलंबून आहे.

 या ट्रॅक्टरची महत्त्वाची वैशिष्ट्ये

हे ट्रॅक्टरचे केबिन व एकंदरीत लुक हा जेसीबी सारखा दिसतो. या ट्रॅक्टरचे सीट आणि केबिन खूप आकर्षक असून सीटला सीट बेल्ट देण्यात आला आहे तसेच या सिटचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सीटवर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर किती वजनाचा आहे त्यानुसार ऍडजेस्टमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

यामध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली असून हे टेलिस्कोपिक पद्धतीची स्टेरिंग असून ती आत बाहेर होते. तसेच या स्टेरिंगला खालच्या साईडला एक नॉब देण्यात आली असून त्याच्या साह्याने स्टेरिंग मागेपुढे करता येते. म्हणजेच या सुविधांमुळे तुम्ही सीटवर बसल्यानंतर तुमची उंची व तसेच तुम्हाला कम्फर्टेबल राहिल त्या पद्धतीने स्टेरिंग अड्जस्ट करू शकतात. या ट्रॅक्टरचे केबिन संपूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले असून त्या पद्धतीने सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

या ट्रॅक्टरचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ट्रॅक्टरचा एक्सीलेटर तुम्ही बोटाने ऍडजेस्ट करू शकतात व अगदी स्मूथली. तसेच या केबिनमध्ये डिप्रेन्सल लॉक देण्यात आला असून ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकले तर याच्या साह्याने दोघ मागची टायर एकसारख्या ताकदीने ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी मदत करतात. हे ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्ह असलेले ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरला बारा फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स गिअर देण्यात आलेले आहेत.

या ट्रॅक्टरच्या केबिनमध्ये जीपीएस किट देण्यात आली असून त्याच्या साह्याने तुमचा ट्रॅक्टर कुठे आहे? काय काम करत आहे आणि त्याच्यामध्ये डिझेल किती शिल्लक आहे? इत्यादी बद्दल सगळी माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कळते. विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही हे ट्रॅक्टर चालवतात तर बाहेरचा कुठलाही प्रकारचा आवाज आत मध्ये तुम्हाला ऐकायला येत नाही म्हणजेच नॉईस कॅन्सलेशन हे महत्त्वाचे वैशिष्ट्ये यामध्ये देण्यात आलेले आहे.

तुम्हाला जर या ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरणी करायची असेल तर ती तुम्हाला किती खोलवर करायची आहे याचे ऍडजेस्टमेंट तुम्हाला करण्याची सुविधा केबिनमध्ये देण्यात आलेली आहे. या ट्रॅक्टरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे 65 hp चे ट्रॅक्टर आहे परंतु यामध्ये एक बटन देण्यात आले असून त्याच्या मदतीने तुम्ही हे ट्रॅक्टर 65 एचपी वरून 55 एचपी क्षमतेपर्यंत करू शकतात. याकरिता स्टेरिंग जवळ एक छोटेसे बटन देण्यात आले असून याच्या साह्याने समजा तुम्हाला जर हलके काम करायचे असेल तर तुम्ही  65 एचपी वरून एका बटनच्या सहाय्याने हे ट्रॅक्टर 55 एचपी पर्यंत आणू शकतात

आणि याचा फायदा तुम्हाला मायलेज चांगले मिळेल यासाठी होणार आहे. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता 2500 किलोग्रॅम पर्यंत आहे. तुम्हाला जड उपकरणे  या ट्रॅक्टरला जोडायची असतील तर त्यासाठी खास वैशिष्ट्य असलेले लिव्हर देण्यात आलेले आहे. या ट्रॅक्टरचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे पुढच्या बाजूच्या टायरमध्ये हवा नाहीतर पाणी देण्यात आलेले आहे. ट्रॅक्टरचा व्हिल बेस 2050 एमएम इतका आहे. मागचा टायर हा जेसीबीचा टायर ज्या आकाराचा असतो त्या आकाराचा आहे. अशा अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेले आहेत.