Krishi Yantra: या छोट्याशा यंत्राने पिकांची काढणी करणे होईल सोपे! खर्चात होईल बचत वाढेल उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Krishi Yantra:  कृषी क्षेत्र आणि तंत्रज्ञान या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून मोठ्या प्रमाणावर आता तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रामध्ये केला जात आहे. यामुळे शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांचे कष्ट कमी झालेच परंतु  वेळ आणि पैशात देखील मोठ्या प्रमाणावर बचत झाली. कृषी क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक यंत्रे विकसित करण्यात आले असून या यंत्रांच्या साह्याने पिकांची लागवड ते काढणीपर्यंतची अनेकविध कामे कमीत कमी वेळेत पूर्ण करता येतात.

अशा अनेक प्रकारची यंत्रे आता विकसित करण्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे खूप सुलभ झाले आहे. याच अनुषंगाने कानपूर येथील दोन इंजिनियर्सने आयआयटी मधून शिक्षण घेतले व ते शेतकऱ्यांना उपयुक्त पडतील असे यंत्रे तयार करण्यासाठी मेहनत घेत असून त्यांनी विकास नावाचा स्टार्टअप सुरू केलेला आहे.

अनंत चतुर्वेदी असं त्यांचे नाव असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी या स्टार्टअप च्या माध्यमातून स्कायथ नावाचे एक उपकरण बनवले आहे. हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे यंत्र असून या माध्यमातून शेतकऱ्यांना चारा काढणीपासून ते भात व गहू असे अनेक प्रकारच्या उभ्या पिकांची काढणी करता येणे शक्य होणार आहे. हे उपकरण खूप कमी किमतीचे असून या माध्यमातून मात्र कष्ट आणि वेळ खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा वाचणार आहे.

 या उपकरणामुळे आता पिकांची काढणी होईल सोपी

स्कायथ नावाचे हे उपकरण चालवण्यासाठी कुठल्याही प्रकारची वीज किंवा डिझेलची आवश्यकता भासत नाही. हे उपकरणाच्या साह्याने पिकाची काढणी मुळापासून करता येणे शक्य आहे. त्यामुळे काढणी करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये पिकांचे अवशेष राहत नसल्यामुळे अवशेष जाळण्याची समस्या देखील राहत नाही.

या उपकरणाच्या साहाय्याने शेतकरी 24 तासांमध्ये दोन बिगे गव्हाची काढणी करू शकतात. तसेच यंत्राच्या साह्याने भात आणि बार्ली आणि हिरवा मका व हिरवा चाऱ्याची देखील कापणी करता येते. जर आपण कम्बाईन मशीनच्या माध्यमातून पिकांची काढणी केली तर खूप मोठ्या प्रमाणावर भुसा आणि धान्याची नासाडी होते.

परंतु या उपकरणाच्या साह्याने जर काढणी केली तर धान्याची कुठल्याही प्रकारे नासाडी होत नाही व 100% पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट वाचावा याकरिता विकास या स्टार्टअपचे संचालक अनंत चतुर्वेदी यांनी अनेक कृषी यंत्र बनवली असून या माध्यमातून त्यांनी अनेक विविध पर्याय देण्याचा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केला आहे.

याविषयी बोलताना अनंत चतुर्वेदी यांनी म्हटले की स्कायथ टूल एक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय असून कम्बाईन मशीनच्या साह्याने कापणी करणे शेतकऱ्यांसाठी खूप महाग पडते. परंतु स्कायथ उपकरणाच्या साह्याने शेतकरी  पिकाची काढणी अगदी सहजरीत्या करू शकतात.

स्कायथ मशीन ची किंमत

हे यंत्र शेतकरी हाताने चालवू शकतात. जर आपण या यंत्राची किंमत पाहिली तर ती शेतकऱ्यांना परवडण्यासारखी असून फक्त साडेसात हजार रुपयांमध्ये हे यंत्र शेतकरी विकत घेऊ शकतात. शेतीच्या कुठल्याही हंगामामध्ये या उपकरणाचा फायदा शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो.